February 19, 2025

Samrajya Ladha

बाणेर येथे सौ. पूनम विधाते आयोजित “उडान नारीशक्ती रन” यशस्वी: महिलांचा उत्साहाला उधाण..

बाणेर :

बाणेर येथे वामा वुमन क्लब अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर महिला कार्याध्यक्ष सौ.पुनम विशाल विधाते यांच्या वतीने महिलांच्या आरोग्य आणि सशक्तीकरणासाठी आयोजित केलेला “उडान नारीशक्ती रन” उत्साह आणि जल्लोषात यशस्वीपणे पार पडला. आज सकाळी बाणेर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान, ताम्हाणे चौक येथे झालेल्या या उपक्रमाने महिलांचा प्रचंड सहभाग आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवली.

 

कार्यक्रमासाठी मा.श्री. चंद्रकांत दादा पाटील (उच्चतंत्र शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य), मा. सौ. सुनेत्राताई पवार (खासदार), मा.श्री शंकर भाऊ मांडेकर (आमदार, भोर-मुळशी-राजगड मतदारसंघ) आणि मा.रूपालीताई चाकणकर (प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी महिला काँग्रेस) तसेच श्रुती मराठे (सिने अभिनेत्री) इत्यादी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली.

सौ. पुनम विशाल विधाते यांनी महिलांच्या आरोग्य जागृतीसाठी आणि सबलीकरणासाठी सुरू केलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. या उपक्रमातून महिलांना नवी दिशा मिळेल
सौ. सुनेत्रा पवार(राज्यसभा खासदार)

महिलांच्या आरोग्याप्रति जनजागृतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर महिला मोर्चा कार्याध्यक्षा आणि वामा वुमन्स क्लबच्या पुनमताई विधाते यांच्या माध्यमातून बाणेर मध्ये “उडान नारीशक्ती रन मॅरेथॉन”चे सुरेख आयोजन करण्यात आले होते. अतिशय स्तुत्य उपक्रम ताईंनी राबविला त्यांना शुभेच्छा !
नामदार चंद्रकांत दादा पाटील ( उच्च तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य)

महिलांनी या कार्यक्रमाचा खूप आनंद घेतला आणि एकत्र येऊन उत्साहाने सहभाग नोंदवला. चौदा हजार सहाशे महिलांनी विक्रमी सहभाग नोंदवला. उपक्रमाने महिलांच्या सशक्तीकरणाला नवी दिशा दिली असून, त्यांच्या आरोग्यासाठी सकारात्मक बदल घडवण्याचे काम केले आहे. महिलांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल त्यांचे खूप खूप आभार.
सौ. पुनम विशाल विधाते (वामा वुमन क्लब अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर महिला कार्याध्यक्ष)

या उडान रन मध्ये 81 वर्षांच्या एका आजींनी सहभाग नोंदवला तसंच सात महिन्यांची गर्भवती महिलासुद्धा या रन मध्ये सहभागी होऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमाची संपूर्ण यशस्विता पूनम विशाल विधाते आणि त्यांच्या टीमच्या अथक प्रयत्नांमुळे साध्य झाली आहे. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले आणि महिलांनी व्यक्त केलेल्या आनंदाने हा उपक्रम संस्मरणीय ठरला.

यावेळी पुणे जिल्हा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनील भाऊ चांदेरे, पुणे महानगरपालिकेचे मा. नगरसेवक प्रमोद अण्णा निम्हण, मा. नगरसेविका सुषमाताई निम्हण, पंचायत समिती मुळशीच्या मा. सभापती सारिकाताई मांडेकर,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराचे उपाध्यक्ष राहुल दादा बालवडकर, औंध प्रभाग समितीचे मा. स्वीकृत सदस्य अर्जुन शिंदे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गणपत मुरकुटे पाटील, माजी उपसरपंच चंद्रकांत जाधव, महाळुंगे गावचे उपसरपंच युवराज कोळेकर, मा उपसरपंच काळुराम गायकवाड, माजी उपसरपंच अजिंक्य निकाळजे, माजी उपसरपंच पांडुरंग पाडाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोथरूड मतदार संघाचे कार्याध्यक्ष नितीन कळमकर, पैलवान समीर कोळेकर, योगीराज नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र मुरकुटे, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन ननावरे, संजय ताम्हाणे ,प्राईड ग्रुपचे सर्वेसर्वा अरविंद जैन, नाईकनवरे डेव्हलपरचे संचालक आनंद नाईकनवरे, उद्योजक विनायक काकडे, नितीनजी खोंड, भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष राहुल पारखे, राष्ट्रवादी युवकचे प्रभाग अध्यक्ष शेखर सायकर, उद्योजक प्रणवजी कळमकर, राष्ट्रवादीचे नेते मिलिंद वालवडकर, बालेवाडीचे मा. पोलीस पाटील अशोक कांबळे, मुळशी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष निलेश पाडळे ,बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन विजय विधाते, रामदास विधाते, भगवान विधाते राजेश विधाते ,सुनील विधाते ,गौरव विधाते, अक्षय विधाते, तुषार विधाते तसेच बाणेर, बालेवाडी, सूस, माहाळुंगे येथील विविध सोसायट्यांचे चेअरमन, पदाधिकारी आणि प्रतिष्ठित मान्यवर महिला भगिनी उपस्थित होत्या.