बाणेर :
माजी नगरसेविका ज्योती गणेश कळमकर व भाजपा पुणे शहर सरचिटणीस गणेश कळमकर यांच्या माध्यमातून सन इ २०२५ या वर्षांसाठी दिनदर्शिकाचे प्रकाशन गणेश कळमकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री श्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी वाढदिवसाच्या निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास नागरिकांनी आणि विशेषता युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दे रक्तदान करून कळमकर यांना शुभेच्छा दिल्या.
भारतीय जनता पार्टीचा नेता आपला वाढदिवस सेवा दिवस म्हणून साजरा करत असतो. आमचे बाणेर बालेवाडी भागातील नेते गणेश कळमकर यांनी देखील आपला वाढदिवस रक्तदान शिबिर आणि नागरिकांना दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी पडणाऱ्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करत साजरा करत आहेत. त्यांनी नेहमीच विविध उपक्रमातून नागरिकांची सेवा केली आहे. आज देखील अतिशय स्तुत्य उपक्रम राबवत आपला वाढदिवस साजरा करत आहेत त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
– नामदार चंद्रकांतदादा पाटील
उच्च तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज
आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आपला वाढदिवस कसा साजरा व्हावा याचा एक आदर्श घालून दिला आहे त्यांचे अनुकरण करत माझा वाढदिवस देखील सेवा दिवस म्हणून साजरा व्हावा याच उद्देशाने रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासत असतो हे लक्षात घेऊन मणिपाल हॉस्पिटलच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित केले आणि नागरिकांना उपयोगी पडेल तसेच दैनंदिन जीवनामध्ये अतिशय महत्त्व असलेल्या दिनदर्शिकाचे प्रकाशन करत ती नागरिकांसाठी उपलब्ध करून देत आहे.
– गणेश कळमकर
सरचिटणीस, भाजपा पुणे शहर
माजी नगरसेविका ज्योती कळमकर,माजी नगरसेविका स्वप्नाली ताई सायकर, माजी नगरसेवक ज्ञानेश्वरभाऊ तापकीर, भाजपा प्रदेश ओबीसी मोर्चा सरचिटणीस प्रल्हाद सायकर, पुणे शहर सचिव लहू बालवडकर, भाजपा नेते गिरीश भेलके, भाजपा महिला मोर्चा सरचिटणीस वैशालीताई कमाजदार, उद्योजक राजेंद्र मुरकुटे पाटील यादी मान्यवर उपस्थित होते.
More Stories
महाळुंगे आणि सुस परिसरातील नागरिकांच्या समस्यां सोडविण्यावर भर देणार आमदार शंकर भाऊ मांडेकर यांचे ‘जनता दरबार’, मध्ये नागरिकांना आश्वासन…
औंधगाव ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज उत्सव २०२५ आनंदात साजरा
“बाणेरवासीयांच्या आरोग्यासाठी सौ. पूनम विधाते यांचा पुढाकार, अजितदादांकडे गार्बेज प्लांट हटवण्याची मागणी”