सुसगाव :
सुस गावातील जैन मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम स्थायी समितीचे मा. अध्यक्ष मा. बाबूरावजी चांदेरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून तेथील नागरिकांसोबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पुणे शहर अध्यक्ष समीर चांदेरे यांनी भेट देत सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला.
सुस येथील नव्याने जिर्णोद्धार झालेल्या जैन मंदिरात जाऊन प्रार्थना करण्याचा आणि या पवित्र स्थळाचे सौंदर्य अनुभवण्याचा लाभ झाला. जैन मंदिरात होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांमुळे येथे भाविकांची वर्दळ वाढत आहे. स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने आणि चांदेरे साहेबांच्या प्रगल्भ दृष्टिकोनामुळे हा महत्वाचा प्रकल्प प्रत्यक्षात साकार होत आहे. नागरिकांच्या पाठींब्यानेच अशा प्रकल्पांना यश मिळत आहे. आपण सर्वांच्या सहकार्याने सुस गावाचा विकास घडवत राहू.
– समीर चांदेरे
युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर
या विकास कार्यामुळे मंदिरात जाणाऱ्या भाविकांना अधिक सोयीसुविधा उपलब्ध होतील आणि स्थानिकांचा दैनंदिन प्रवासही सुखकर होणार आहे. त्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी