बालेवाडी :
मा.चंद्रकांतदादा पाटील यांना महाराष्ट्र सरकार मध्ये उच्च तंत्र शिक्षण आणि संसदीय कामकाज
खात्याचे कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे. यासाठी त्यांचे अभिनंदन बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन तर्फे आज करण्यात आले.
दादांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याने बाणेर बालेवाडी भागातील विविध कामे मार्गी लागतील असा विश्वास बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन तर्फे व्यक्त करण्यात आला.
अपूर्ण रस्ते, पाणीपुरवठा प्रश्न, बालेवाडीत पेट्रोल पंप, ट्रॅफिक जॅम इत्यादी समस्यांवर उपाय योजना यासाठी मा.चंद्रकांत दादांचे सहकार्य मिळेल अशी आशा आहे. दादांनी सर्व समस्यांवर मदत करण्याचे आश्वासन दिले.
बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनचे अशोक नवाल, परशुराम तारे, डी.डी. सिंग, मोरेश्वर बालवडकर, वैभव आढाव, शकिल सलाती, रमेश रोकडे व इतर सदस्य या प्रसंगी हजर होते.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी