May 8, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बालेवाडी येथील सी एम इंटरनॅशनल विद्यालयाचा 2024-25 वर्षाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न..

बालेवाडी :

सी एम इंटरनॅशनल विद्यालयाचा 2024-25 वर्षाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मंगळवार, दि.24 डिसेंबर 2024 रोजी मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयाच्या परंपरेनुसार विशिष्ठ संकल्पनेवर आधारित स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येते. या वर्षी ‘क्रीडा’ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम विद्यालयाच्या प्रांगणात सादर करण्यात आला.

 

हिंदी चित्रपट भारतीय चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, प्रेक्षकांना प्रेरणा देतात आणि संस्कृतीला प्रोत्साहन देतात. या स्नेह संमेलनाचा विषय होता हिंदी सिनेमा-सफर-ए-सिनेमा -हरिश्चंद्र ते भारत 2.O हा प्रवास, ज्यात विविध कथा, पात्रे, नृत्य, संगीत आणि इतर अनेक पैलूंचे परिवर्तन साजरे केले. .

या वेळेस महान किराणा परंपरेतील नवीन पिढीतील सर्वात होनहार कलाकार आनंद भाटे हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच IPS ऑफिसर निखिल पिंगळे यांनी देखील उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली

प्रमुख पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे संस्थापक श्री. गणपत म्हातोजी बालवडकर, सचिव श्री. सागर बालवाडकर व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका इक्बाल कौर राणा यांनी केले.

हे स्नेहसंमेलन केवळ नाट्य, नृत्य यांचा अविष्कार न राहता ते विचारांचे संमेलन बनले, हे संमेलन अंतर्मुख करणारे होते असे प्रतिपादन आनंद भाटे आपल्या भाषणात केले; तसेच हिंदी सिनेमा हा विषय निवडून देखील केवळ नाते संबंध व सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून सादरीकरण केल्याबद्दल आनंद भाटे यांनी संस्थेचे, विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले.

तसेच निखिल पिंगळे यांनी आज पालक तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सोशल मीडिया च्या वापराबद्दल सजग राहायचे आवाहन देखील केले ज्याने आपल्या आसपास व आपल्या पाल्याच्या आयुष्यात काय चालू आहे याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल. यामुळे आपण त्यांना संरक्षित जीवन प्रदान करू शकू असेही ते म्हणाले.