सुस :
सुस म्हाळुंगे बॉर्डर जवळ असणाऱ्या सारथी सोसायटी जवळ पुणे मनपाचे माजी स्थायी समिती अध्यक्ष मा.बाबूरावजी चांदेरे साहेबांच्या प्रयत्नातून पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठ्याचा शुभारंभ आणि सुस-म्हाळुंगे बॉर्डर सोसायटीज असोसिएशनच्या वतीने नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी कायम अग्रेसर असणाऱ्या माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
सुस म्हाळुंगे बॉर्डर भागातील पिण्याच्या पाण्याचा दीर्घकालीन प्रश्न अखेर कायमचा मार्गी लागला आहे. पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून पुढील काही दिवसांत या भागात पाण्याचे वितरण सुरू होणार आहे. हा विकासाचा महत्त्वाचा टप्पा साध्य होणार आहे,याचे मला खूप समाधान आहे. सुस-म्हाळुंगे बॉर्डर सोसायटीज असोसिएशनने यासाठी माझा सन्मान केला, याबद्दल मी त्यांचा मनःपूर्वक आभारी आहे, या आधी अनेकदा माझा सत्कार झालाय पण हा सत्कार खूप विशेष वाटला त्याचे कारण म्हणजे स्थानिकांनी माझ्या आजवरच्या कार्याची दखल घेवून मनाला भावणाऱ्या आपुलकीच्या शब्दात लिहलेले मानपत्र कायम स्मरणात राहणारे आहे. आपल्या विश्वासाने आणि सहकार्यानेच हे शक्य झाले आहे, आणि मी सदैव या भागातील नागरी समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहीन.
– बाबुराव चांदेरे
मा. अध्यक्ष स्थायी समिती पुणे महानगर पालिका
सुस-म्हाळुंगे बॉर्डर सोसायटीज असोसिएशन आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्यानेच ही गोष्ट शक्य झाली आहे. नागरिकांनी दाखवलेली एकजूट आणि सोसायटीच्या सदस्यांनी केलेले सहकार्य, यामुळेच या प्रकल्पाला यश मिळाले आहे. या ऐतिहासिक पाणी प्रकल्पामधे माझे वडील, पुणे मनपाचे माजी स्थायी समिती अध्यक्ष मा. बाबूराव चांदेरे साहेब यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या दुरदृष्टी, अथक परिश्रम, आणि प्रामाणिक प्रयत्नांमुळे हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरला असल्याने स्थानिक नागरिकांनी मा. बाबूराव चांदेरे साहेब यांचा भव्य नागरी सत्कार देखील केला. मा.चांदेरे साहेबांचा हा सत्कार म्हणजे त्यांच्या कार्याची पावतीच आहे.
– समीर चांदेरे
युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर
यावेळी सतेज कबड्डी संघाच्या वतीने श्री. अजयभाऊ सुनील भुजबळ यांचा सत्कार करण्यात आला, ज्यांची इस्रो (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) मध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. अजयभाऊंचे हे यश फक्त बाणेर नव्हे तर संपूर्ण पुणे शहरासाठी अभिमानास्पद आहे. तसेच आपल्या सुस येथील दिव्यशांती सोसायटीचे रहिवासी श्री. विशाल भाऊ पाटील यांचा देखील सन्मान करण्यात आला. त्यांनी अवघ्या ९ दिवसांत सुस (पुणे) ते श्रीराम जन्मभूमी, अयोध्या आणि पुन्हा सुस असा १७०० किलोमीटरचा सायकल प्रवास यशस्वीपणे पूर्ण करून आपला परिसर उजळून टाकला आहे. त्यांची चिकाटी, जिद्द, आणि समर्पण आपल्यासाठी प्रेरणादायी आहे.
यावेळी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुलदादा बालवडकर, किरण चांदेरे, यांच्या सह सूस, म्हाळुंगे, बाणेर आणि बालेवाडी मधील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.
More Stories
पेरीविंकलच्या विद्यार्थ्यांचे क्रिडा कौशल्य कौतुकास्पद – अविनाश मांढरे ( वरिष्ठ पोलीस निरिक्षक – C.I.D. ब्रांच.
पेरिविंकल च्या पौड शाखेत नॅशनल मॅथेमॅटीक्स डे उत्साहात साजरा !!!
हिवाळी अधिवेशनात आमदार शंकर मांडेकर यांनी सुस-म्हाळुंगे गावांसोबतच मतदारसंघाच्या समस्या मांडत त्या सोडविण्याची केली मागणी..