December 22, 2024

Samrajya Ladha

औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत सूक्ष्म/खोलवर स्वच्छता (Deep Clen Drive) अभियानमध्ये सुतारवाडी येथील रस्ता स्वच्छ…

सुतारवाडी :

स्वच्छ सर्वेक्षण २०२४ स्वच्छ भारत अभियान अन्वये दिनांक २१ डिसेंबर २०२४ रोजी औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत कुमार पेपिलॉन सुतारवाडी शेवटचा बस स्टॉप रस्ता ते पाषाण लेक महादेव मंदिर याठिकाणी सूक्ष्म/खोलवर स्वच्छता (Deep Clen Drive) अभियान आयोजित करण्यात आले होते.

 

मा. संदिप कदम उपआयुक्त घनकचरा व्यवस्थापन, मा. अविनाश सकपाळ उपआयुक्त परिमंडळ क्र.२, मा. गिरीष दापकेकर महापालिका सहाय्यक आयुक्त औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालय यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नियंत्रणाखाली घनकचरा/आरोग्य विभाग, (स्थापत्य/बांधकाम/ड्रेनेज/पथ/विद्युत) अभियंता विभाग, आकाशचिन्ह, अतिक्रमण विभाग, उद्यान विभाग यातील सर्व अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते. या अभियाना मध्ये मा. राहुल कोकाटे, मा. शिवम सुतार, मा. बालम तात्या सुतार व मा. सचिन पाषाणकर व स्थानिक नागरिक हेदेखील प्रचंड संख्येने सहभागी झाले होते.

श्री. विजय भोईर वरिष्ठ आरोग्य निरीक्षक यांच्या नियंत्रणाखाली सर्व आरोग्य निरीक्षक/मोकादम/सफाई सेवक यांनी संपूर्ण रस्त्याची सूक्ष्म/खोल स्वच्छता करून अस्वच्छता करणाऱ्या १३ व्यक्ती/दुकाने यांचेवर कारवाई करून रक्कम रु. ४०००/- दंड वसूल केला.

त्याचप्रमाणे बांधकाम विभाग मा. उपअभियंता श्री. पवार साहेब अतिक्रमण विभाग श्री धंनजय नेवसे यांच्या संयुक्तपणे 13 अनधिकृत बांधकाम/दुकाने/पथारी/हातगाडी यांच्यावर कारवाई करण्यात आली.

विद्युत विभाग मा. उप अभियंता श्री. अशोक केदारी अ यांच्या नियंत्रणाखाली १२०० मीटर अनधिकृत इंटरनेट केबल व रस्त्यावर पडलेले विद्युत उचलून घेण्यात आले. तसेच उद्यान विभाग मार्फत श्री. साबळे यांच्या नियंत्रणाखाली 09 वृक्षाच्या अतिरिक्त वाढलेल्या फांद्या तोडण्यात आल्या. या डीप क्लिनिंग अभियानच्या शेवटी सर्वानी स्वच्छतेची शपथ घेत अभियानाची सांगता केली.