June 1, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पेरीविंकलच्या विद्यार्थ्यांचे क्रिडा कौशल्य कौतुकास्पद – अविनाश मांढरे ( वरिष्ठ पोलीस निरिक्षक – C.I.D. ब्रांच.

पेरीविंकल चे विद्यार्थी इतर क्षेत्राबरोबर क्रीडाक्षेत्रातही अग्रेसर !– नंदकुमार शेलार.
वन परीमंडल अधिकारी

पिरंगुट :

चैतन्य विद्या प्रतिष्ठान च्या पेरीविंकल इंग्लीश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या पिरंगुट शाखेचा वार्षिक क्रिडादिन आज दिनांक २१ डिसेंबर रोजी अत्यंत उत्सहवर्धक वातावरणात संपन्न झाला.
भरे क्रीडा संकुल येथील भव्य पटांगणावर आजचा हा पेरीविंकल इंग्लीश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चा वार्षिक क्रीडादिन मोठ्या दिमाखात भरे येथील भव्य दिव्य पटांगणात सुरु झाला. निमंत्रित प्रमुख पाहुण्याचे स्वागत ढोल ताशांच्या गजरात करण्यात आले. कार्यक्रमाचा प्रारंभ प्रथे प्रमाणे सरस्वती पूजन करून करण्यात आला. यावेळी आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित मान्य वरांमध्ये मा. श्री. अविनाश मांढरे (C.I.D वरिष्ठ पोलिस निरिक्षक ) , नंदकुमार शेलार (वन परीमण्डल अधिकारी), मकरंद माने, तसेच कासार आंबोलीच्या सरपंच सुवर्णाताई मारणे, माजी सरपंच राजेंद्र मारणे, विशाल शेटे, भरत सावंत, सचिन कोंडे यांच्या समवेत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र बांदल सर, संचालिका रेखा बांदल, तरुण व तडफदार डायरेक्टर शिवानी बांदल, मुख्याध्यापक अभिजित टकले, निर्मल पंडीत आदी मान्यवर उपस्थित होते.

पाहुणे स्थानापन्न झाल्यावर पाहुण्याची थोडक्यात ओळख करून दिल्यानंतर सर्व उपस्थित मान्यवरांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा श्री राजेन्द्र बांदल सर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. तसेच कासार आंबोली च्या नवनिर्वाचित सरपंच सुवर्णाताई मारणे यांचा पेरीविंकल स्कूल च्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.

विद्यार्थी दशेपासून पोलीस दलात रुजू होण्या पर्यंतचा उत्साही आणि कष्टप्रद प्रवास ओघवत्या शब्दात अविनाश मांढरे यांनी मांडला. शारीरिक तंदुरुस्ती कशी महत्वाची आहे ते त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.

नरेंद्र शेलार यांनी जंगल, निसर्ग आणि मानवी समाज अस्तित्वाचे महत्त्व आपल्या अनुभवातून आलेल्या जाणतेपणी विद्यार्थी वर्गाला सांगून निसर्गाची जपणूक करण्याचा सल्ला दिला. पेरीविंकल केवळ अभ्यासाच्या क्षेत्रातच नव्हे तर क्रीडा, कला, निसर्ग संवर्धन, सामाजिक बांधिलकी अशा सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे हे आवर्जून नमूद केले.

राष्ट्रीय सायकलपटू मकरंद माने याना भेटण्यासाठी सर्वच विद्यार्थ्यांनी गर्दी केली. त्यांचा सलग ११ वर्षे सायकल चालविण्यामधील आठवणी त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितली. आयुष्यात प्रगती साध्य करण्यासाठी शिस्त फार महत्वाची आहे असे ते म्हणाले. शारीरिक आणि मन:स्वास्थ्यासाठी आहार विहार सांभाळण्याचा सल्ला त्यांनी दिला.

संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल सरांनी विद्यार्थी दशेतील खेळाचे, आणि त्या पाठोपाठ येणा–या शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. खेळाच्या माध्यमातून भारतरत्न मिळविणा–या सचिन तेंडूलकर चे उदाहरण त्यांनी दिले. अभ्यास तर आहेच, पण त्याच बरोबर खेळही आपल्या आयुष्यात तेवढाच महत्वाचा आहे, हे क्रीडा दिनाच्या औचित्याने सरांनी सांगितले.

स्वागत पर आकर्षक नृत्य, कवायत प्रकार, नियोजनबद्ध मनो-यांचे प्रदर्शन, तायक्वादो मधील कौले फोडण्याचे प्रात्यक्षिक उपस्थितांना स्तिमित करून गेले.

आजच्या या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन हे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल सर, संचालिका रेखा बांदल मॅडम, संचालिका शिवानी बांदल मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली पिरंगुट शाखेचे मुख्याध्यापक डॉ अभिजित टकले यांच्या मार्गदर्शनाने माध्यमिक पर्यवेक्षिका पूनम पांढरे, प्राथमिक पर्यवेक्षिका सना इनामदार, तसेच पूर्व प्राथमिक पर्यवेक्षिका पल्लवी नारखेडे यांनी केले. यात शाखेतील क्रीडा शिक्षक मणेरे सर, तसेच बाकी सर्वच शिक्षक वर्गाचे योगदान होते.

सादरीकरणासाठी सर्वच शिक्षकांची मौलिक साथ मिळाली. रांगोळी, इतर सजावट, विद्यार्थ्यांची तयारी या आणि अशा कामात सर्वांचाच मोठा वाटा होता. आजच्या क्रीडादिनी आपापल्या पाल्यांचे क्रीडा कौशल्य पाहण्यासाठी पालक वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता.