December 21, 2024

Samrajya Ladha

सूसमधील वेदांत सोसायटीमधील नागरिकांसोबत नागरी समस्यांवर साधला समीर चांदेरे यांनी संवाद…

सुस :

सूसमधील वेदांत सोसायटीला भेट देत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष समीर चांदेरे यांनी सोसायटीमधील नागरिकांसोबत नागरी समस्यांवर मोकळेपणाने संवाद साधला. या वेळी संकष्टी चतुर्थी असल्याने सोसायटीच्या वतीने गणरायाची आरती घेण्याचा सन्मान त्यांना देण्यात आला.

 

सूसमधील वेदांत सोसायटीला भेट देऊन चर्चेदरम्यान पुढे आलेल्या पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि सोयीसुविधांच्या प्रश्नांवर लवकरात लवकर पुणे मनपाचे माजी स्थायी समिती अध्यक्ष मा.बाबूरावजी चांदेरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना केल्या जातील, असा विश्वास नागरिकांना दिला.
समीर चांदेरे
(युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर)

यावेळी गणेश भाऊ निम्हण, दत्ताभाऊ भोरे, हेमंत पाटील साहेब उपस्थित होते.