March 22, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सुस गावातील दिव्यशांती सोसायटी कडे जाणाऱ्या रस्त्यांवर समीर चांदेरे यांच्या प्रयत्नातून डांबरीकरणाला सुरुवात….

सुस :

सुस गावातील दिव्यशांती सोसायटीतील रस्त्याची दुर्दशा असल्याने तो रस्ता दुरुस्त व्हावा अशी मागणी पुणे मनपाचे माजी स्थायी समिती अध्यक्ष मा. बाबूराव चांदेरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांच्याकडे केली होती. चांदेरे यांनी पाठपुरावा करून सोसायटीच्या परिसरातील रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू करून घेतले. तसेच प्रत्यक्ष काम सुरू असताना दर्जेदार काम कसे होईल याकडे लक्ष दिले.

युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांनी सतत वेगवेगळ्या सोसायट्यांशी संपर्क साधत तेथील नागरीकांच्या अडचणी जाणून घेत त्या सोडविण्यावर भर दिला आहे. सुस गावातील दिव्यशांती सोसायटीतील नागरिकांनी मोठया विश्वासाने त्यांना रस्त्याची दुरवस्था मुळे होणारी अडचण सांगितली. त्यांनी नागरिकांचा विश्वास सार्थ ठरवत पुणे मनपाचे माजी स्थायी समिती अध्यक्ष मा. बाबूराव चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे महानगर पालिकेसोबत पाठपुरावा करत रस्त्याचे डांबरीकरण करून घेत आहेत. त्यामुळे सोसायटीमधील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

सुस गावातील दिव्यशांती सोसायटीच्या परिसरातील रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम प्रत्यक्षात सुरू झाले आहे. पुणे मनपाचे माजी स्थायी समिती अध्यक्ष मा. बाबूराव चांदेरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून या रस्त्यांचे काम पूर्ण होत असून रहिवाशांच्या सोयीसाठी दर्जेदार आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या रस्त्यांचे बांधकाम सुनिश्चित करण्यात येत आहे. आपल्या विकासप्रेमी दृष्टिकोनासाठी आणि सहकार्यासाठी दिव्यशांती सोसायटीतील सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार!
समीर चांदेरे (युवक अध्यक्ष : पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस)