December 22, 2024

Samrajya Ladha

बालेवाडी येथे श्री. अलंकापुरी पंचक्रोशी प्रदक्षिणा सोहळा – २०२४ मोठया उत्साहात संपन्न..

बालेवाडी :

सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील ह भ प ज्ञानेश्वर माऊली महाराज कदम (छोटे) यांच्या प्रेरणेने बुधवारी दिनांक १८ डिसेंबर २०२३ रोजी बालेवाडी येथे श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्ट बालेवाडी चे अध्यक्ष संजय बालवडकर, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर उपाध्यक्ष राहुल बालवडकर व माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या वतीने आयोजित श्री. अलंकापुरी पंचक्रोशी प्रदक्षिणा सोहळा – २०२४ मोठया उत्साहात संपन्न झाला.

 

पंचक्रोशी मधिल सर्व भाविक भक्तांसाठी हा सोहळा एक मंगल पर्वणी ठरला. बालेवाडी येथील विठ्ठल मळा(गो शाळा) येथे हा सोहळा मोठया थाटात साजरा करण्यात आला. यावेळी संत ज्ञानेश्र्वर महाराज यांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. शेकडो भाविकांनी यावेळी दर्शनाचा लाभ घेतला. टाळ मृदंगाच्या गजरात पालखी मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी भाजपा नेते प्रल्हाद सायकर, प्रकाशतात्या बालवडकर, अनिल तात्या बालवडकर, हणमंत तात्या बालवडकर, यांच्यासह बाणेर, बालेवाडी, सूस, म्हाळुंगे परिसरातील सांप्रदायिक क्षेत्रातील विविध मान्यवर व्यक्ती, भक्त मोठया संख्येने उपस्थित होते.