May 18, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

हिवाळी अधिवेशनात आमदार शंकर मांडेकर यांनी सुस-म्हाळुंगे गावांसोबतच मतदारसंघाच्या समस्या मांडत त्या सोडविण्याची केली मागणी..

नागपूर :

नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार शंकर मांडेकर यांनी भोर-राजगड-मुळशी मतदारसंघातील समस्या व विकासासाठीच्या गरजा याची मांडणी केली. वाढत्या नागरीकरणामुळे सुस, म्हाळुंगे, मान, हिंजवडी भागात नागरिकांची मोठी वर्दळ असल्याने वाहतूकोंडीमुळे नागरिकांना फार मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते म्हणून या भागातील रस्ते मोठे करून दोन मोठे पुल उभारले जावे अशी मागणी केली.

 

आपल्या मतदारसंघाची ओळख करून देताना आणि स्थानिक नागरिकांच्या मागण्या व अडचणी आमदार शंकर मांडेकर यांनी प्रभावीपणे व्यक्त केल्या. प्रशस्त रस्ते, शेतकऱ्यांसाठी उपयुक्त योजना, पाणीपुरवठा व्यवस्था अशा विविध मुद्द्यांवर विधानसभेत ठोस चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. विकासाच्या प्रत्येक उपक्रमात आपल्या मतदारसंघाला प्राधान्य मिळेल यासाठी मोठया तळमळतेने आमदार शंकर भाऊ प्रयत्न करत आहेत.

या अधिवेशनाद्वारे मतदारसंघाच्या प्रगतीला गती देण्यासाठी नवनवीन संकल्पनांचा पाठपुरावा करणार असून, नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहीन
आमदार शंकर भाऊ मांडेकर
भोर-राजगड-मुळशी मतदार संघ