December 18, 2024

Samrajya Ladha

बालेवाडी येथील कै. बाबुराव शेठजी गेणुजी बालवडकर प्राथमिक विद्यामंदिर शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न…

बालेवाडी :

बालेवाडी येथील कै. बाबुराव शेठजी गेणुजी बालवडकर प्राथमिक विद्यामंदिर शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी सदर कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर उपाध्यक्ष राहुल बालवडकर यांच्या वतीने सर्वांसाठी अल्पोपहाराची  आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी विद्यार्त्यांसाठी ड्रेपरी व्यवस्था करण्यात आली होती.

 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष राहुलदादा बालवडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अधक्ष समीर चांदेरे, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर महिला कार्याध्यक्ष सौ.पूनम विधाते, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश बालवडकर, पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मनोज बालवडकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या ज्योतीताई बालवडकर, आनंदा कांबळे (पो.पाटील), दिलीप तात्या बालवडकर, अनिल तात्या बालवडकर, अशोक बालवडकर, हणमंत तात्या बालवडकर, शशिभाऊ बालवडकर, ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी विविध क्रीडा प्रकारांमध्ये तसेच अभ्यासात विद्यार्थ्यांनी नैपुण्य दाखविल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.