पौड :
चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरीविंकल इंग्लीश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या पौड, माले व कोळवण या तीनही शाखांच्या अँन्युअल स्पोर्ट्स मीट २०२४-२५ चा शुभारंभ अत्यंत सळसळत्या उत्साहात करण्यात आला . क्रीडादिनानिमित्त पौड शाखेत अत्यंत सुंदर सजावट करण्यात आली होती. दिमाखदार पद्धतीने पाहुण्यांचे अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचा प्रारंभ सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आला होता. यावेळी प्रमुख उपस्थित मान्यवर श्री राजाभाऊ गोरडे मा नगरसेवक यांच्यासह संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा श्री राजेंद्र बांदल,संचालिका सौ रेखा बांदल, संस्थेच्या डायरेक्टर शिवानी बांदल तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित पाहुण्यांचा व मान्यवरांचा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री बांदल सर यांच्याकडून शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. दीपप्रज्वलन करून आपले खेळाडू मशाल घेवून आले व मशाल प्रज्वलित करण्यासाठी मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले. सर्व मान्यवरांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करण्यात आली.
स्पोर्ट्स ने विद्यार्थ्यांमधील अनेक पैलू विकसित होण्यास मदत होते त्यामुळे प्रत्येकाने एक तरी खेळ नक्की खेळावा असे सांगून विशेषतः सातत्य हे खेळात व जीवनात अतिशय महत्वाचे आहे असे सांगून सर्वांनी कामात सातत्यता बाळगली पाहिजे असे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडीत यांनी त्यांच्या भाषणात सांगीतले.
तर सर्वांनी सुद्रुढ व निरोगी राहणे अत्यंत गरजेचे आहे असे सांगून अभ्यासा बरोबरच खेळाची जोड तितकीच महत्वाची असते असे सांगून खेळाचे महत्व शाळेच्या तरुण तडफदार डायरेक्टर शिवानी बांदल यांनी त्यांच्या भाषणात सांगितले.
तर खेळाने माणूस घडतो व त्याचे बरेच पैलू खेळाने विकसीत होतात त्यामुळे खेळ हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे तर खेळाने चिकाटी, धैर्य, सातत्यता, संयम , एकजूट असे अनेक गुण विकसीत होतात तर हरण्याची भीती न बाळगता व जिंकण्याचा गर्व न करता केवळ खेळ म्हणून सर्वांनी खेळले पाहिजे असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा श्री राजेंद्र बांदल यांनी यांच्या भाषणात केले.
तर आनंदी जीवन जगण्यासाठी मन व शरीर निरोगी राहणे गरजेचे आहे.
क्रीडा दिनाचे औचित्य साधून आज या पौड शाखेमध्ये विविध खेळांचे आयोजन करण्यात आले .त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंद आणि उत्साह निर्माण झाला.स्पोर्ट्स डे हा शारिरीक तंदुरुस्ती, टीमवर्क आणि खिलाडूवृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जाणारा वार्षिक कार्यक्रम आहे. हा एक दिवस आहे जेव्हा विद्यार्थी विविध खेळ आणि खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि त्यांच्या क्रीडा कौशल्यांचे प्रदर्शन करण्यासाठी एकत्र आले .
विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती वाढवणे, टीमवर्क, खिलाडूवृत्ती आणि निष्पक्ष खेळाला प्रोत्साहन देणे अत्यंत महत्वाचे असते असे सांगून विद्यार्थ्यांना त्यांच्या खिलाडूवृत्ती साठी कौतुक करून सर्व शिक्षकांचे आभार मानून एकूणच, स्पोर्ट्स डे हा एक मजेदार आणि रोमांचक कार्यक्रम आहे जो विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक फिटनेस, टीमवर्क आणि खिलाडूवृत्तीला प्रोत्साहन देतो असे राजाभाऊ गोरडे यांनी त्यांच्या भाषणात सांगीतले व पेरीविंकल शाळेत अतिथी म्हणून आमंत्रित केल्याबद्दल संस्थेचे व बांदल सरांचे आभार मानून सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
सर्व हाऊस कॅप्टन यांनी हाऊस चे झेंडे घेवून खुप रोमांचक अशी परेड काढून टीमवर्क, सुसूत्रता व शिस्त या सगळ्याचे एकत्रित सादरीकरण परेडमधून सर्वाँना करुन दिले.
क्रीडा दिनाचे आयोजन दोन दिवस असणार आहे.
स्पोर्ट्स डे चे औचित्य साधून एक आगळा वेगळा उत्साही वातावरणात मान्यवरांच्या हस्ते शाळेचा झेंडा मानाने फडकाऊन व राष्ट्रगीताने ओपनिंग सेरेमनी करण्यात आली. भूमीपूजन करून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रस्सीखेच या खेळाच्या ओपनिंग मँच चा प्रारंभ करण्यात आला. सर्व खेळाडूंना मान्यवरांनी उत्तेजीत करून त्यांचा गौरव केला. त्यानंतर इनडोअर गेम्स चे ओपनिंग मान्यवारांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन हे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. राजेंद्र बांदल सर, संचालिका रेखा बांदल व शिवानी बांदल यांच्या अध्यक्षतेखाली शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षिका प्राजक्ता वाघवले व यांच्या सहकार्याने व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मदतीने खेळाचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने साजरा झाला. रांगोळी रेखाटन, फलक लेखन, सजावट या कामात सर्वांनीच हातभार लावला.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ साक्षी इप्ते व श्रेया गडदे यांनी केले.
More Stories
जेष्ठ नागरीक बालेवाडी चैतन्य गायक कट्ट्याचा वर्धापन दिन सोहळा संपन्न..
राष्ट्रीय महामार्ग 48 नऱ्हे ते रावेत सर्व्हिस रोड रुंदीकरण व्हावे म्हणून आमदार शंकर भाऊ मांडेकर यांनी दिले केंद्रीय दळणवळण मंत्री गडकरी यांना निवेदन…
म्हाळुंगे येथील पुराणिक सोसायटी मधील क्रिकेट स्पर्धेला भेट देत समीर चांदेरे यांनी वाढविला सर्व वयोगटातील खेळाडूंचा उत्साह…