बावधन :
चैतन्य विद्या प्रतिष्ठान च्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, बावधन येथे स्पोर्ट्स मीट 2024-25 चे उद्घाटन गुरुवार दिनांक 12 डिसेंबर रोजी अत्यंत उत्साहात उपस्थित मान्यवर, शिक्षवृंद व विदयार्थी यांच्या समवेत करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली.
यावेळी कुमार भारत केसरी श्री. धनराज करंजावणे, बावधन पोलीस स्टेशन चे पोलिस निरिक्षक श्री.अनिल विभुते सर, मेंबर ऑफ डिस्ट्रिक्ट कौन्सिल सौ. स्वातीताई हुलावळे, लीडर ऑफ नॅशनल काँग्रेस पुणे जिल्हा श्री. सुरेश भाऊ हुलावळे, सूर्यकांत भाऊ भुंडे, श्री. संतोष दगडे, सदाशिव घुले तसेच संस्थेचे संस्थापक श्री. राजेंद्र बांदल सर संचालिका सौ.रेखा बांदल व तडफदार संचालिका शिवानी बांदल व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
क्रीडा दिनानिमित्त सुंदर सजावट करण्यात आली होती. क्रीडा दिन शुभारंभाचे औचित्य साधत इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट एरोबिक्स डान्स सर्वांसमोर सादर केला तसेच त्वायकोंदो डेमॉन्स्ट्रेशन विद्यार्थ्यांनी दिले. यावेळी शाळेतील जिल्हा, विभाग पातळीवर खेळाणाऱ्या खेळाडूंनी क्रीडा ज्योत प्रांगणात फिरवली तसेच सर्व मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून क्रीडा दिनाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी कुमार भारत केसरी धनराज करंजावणे यांनी संयम ठेवून अभ्यासाबरोबर मैदानवर विविध खेळ खेळा व निरोगी राहा असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.
तर आनंदी जीवन जगण्यासाठी मन व शरीर निरोगी राहणे गरजेचे आहे. त्यामुळे क्रीडा दिनाचे औचित्य साधून शाळेमध्ये विविध खेळाचे आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये खेळाडू वृत्ती जागरूक होऊन त्यामुळे मुलांमध्ये उत्साह व आनंद निर्माण होतो व स्पोर्ट डे हा शारीरिक तंदुरुस्ती, आरोग्य, टीम वर्क व खिलाडू वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो व त्यामुळे मुलांमध्ये धैर्य, चिकाटी, जिद्द, लीडरशिप, संयम, हार पचवण्याची ताकद असे अनेक गुण खेळाने विकसित होतात त्यामुळे अभ्यासाबरोबरच प्रत्येकाने एक खेळ तरी चिकाटीने खेळलाच पाहिजे असे आवाहन संस्थेचे संस्थापक श्री राजेंद्र बांदल सर यांनी यावेळी केले.
खेळाने माणूस घडतो व त्यामधील सुप्त गुण बाहेर येतात तसेच खेळाने बरेच पैलू विकसित होतात यामुळे खेळ हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. पेरीविंकल मधील विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्तरावर पाहायला नक्कीच आवडेल असे आवाहन सुरेश भाऊ हुळावले यांनी यावेळी केले.
शाळेमध्ये तीन दिवसीय क्रीडा दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे. क्रिदादिनाचे औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते शाळेचा झेंडा फडकावून राष्ट्रगीताने खेळाचे ओपनिंग करण्यात आले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी खेळ प्रतिज्ञा घेतली. त्यानंतर भूमिपूजन करून ओपनिंग मॅच रस्सीखेच घेण्यात आली. तसेच इनडोअर गेमचे ओपनिंग सुद्धा मान्यवरांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
या पूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.निर्मल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली पर्यवेक्षिका कल्याणी शेळके, शिरीन काझी तसेच क्रीडाशिक्षक सुरज साठे सर व विशाल सर व सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने खेळाचे सर्व नियम पाळून हा क्रिडादिनाचा ओपनिंग सेरेमनी चा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा झाला.
संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली गायकवाड यांनी केले.
More Stories
जेष्ठ नागरीक बालेवाडी चैतन्य गायक कट्ट्याचा वर्धापन दिन सोहळा संपन्न..
राष्ट्रीय महामार्ग 48 नऱ्हे ते रावेत सर्व्हिस रोड रुंदीकरण व्हावे म्हणून आमदार शंकर भाऊ मांडेकर यांनी दिले केंद्रीय दळणवळण मंत्री गडकरी यांना निवेदन…
म्हाळुंगे येथील पुराणिक सोसायटी मधील क्रिकेट स्पर्धेला भेट देत समीर चांदेरे यांनी वाढविला सर्व वयोगटातील खेळाडूंचा उत्साह…