बालेवाडी :
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे कोथरूड विधानसभा कार्याध्यक्ष, मा. श्री. जयेश मुरकुटे यांच्या संकल्पनेतून, जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशन आणि वाहतूक नियंत्रण शाखा, बालेवाडी पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने काल दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजी सकाळी सहा ते आठ यावेळेत बालेवाडी हायस्ट्रीट येथे पादचारी दिन साजरा करण्यात आला.
यानिमित्ताने बालेवाडी हायस्ट्रीट 1 आणि हायस्ट्रीट 2 दरम्यानचा रस्ता वाहनमुक्त ठेवण्यात आला होता. हा रस्ता केवळ चालणाऱ्यांसाठी मोकळा ठेवण्यात आला होता.
बाणेर, बालेवाडी आणि परिसरातील असंख्य नागरिक या उपक्रमात मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.
पादचाऱ्यांच्या हक्कांचे रक्षण, सुरक्षितता, आणि त्यांच्या गरजांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. याचा मुख्य उद्देश वाहनांमुळे पादचाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या दूर करणे आणि रस्त्यावरील चालणाऱ्यांच्या सुरक्षिततेला प्रोत्साहन देणे आहे.
यावेळी जेष्ठ नागरिक संघाचे सर्व सदस्य, ऍड. माशाळकर सर, पद्माकरजी राऊत, केदार कदम, बाबा तारे , अर्जुन पसाले, अभिराज भडकवाड, इ पत्रकार बंधू, तसेच वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस निरीक्षक रजनी सरवदे मॅडम, अमोल जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) प्रभाग क्रमांक 9 चे अध्यक्ष सारंगजी कोळेकर, कार्याध्यक्ष पंकज जी खताने, इ. तसेच बाणेरवाडी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशन आणि वाहतूक नियंत्रण शाखेकडून सर्वांचे आभार मानण्यात आले. या उपक्रमाबद्दल जयश मुरकुटे यांचे तसेच जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशनचे सर्व स्तरातून विशेष कौतुक होत आहे.
More Stories
जेष्ठ नागरीक बालेवाडी चैतन्य गायक कट्ट्याचा वर्धापन दिन सोहळा संपन्न..
राष्ट्रीय महामार्ग 48 नऱ्हे ते रावेत सर्व्हिस रोड रुंदीकरण व्हावे म्हणून आमदार शंकर भाऊ मांडेकर यांनी दिले केंद्रीय दळणवळण मंत्री गडकरी यांना निवेदन…
म्हाळुंगे येथील पुराणिक सोसायटी मधील क्रिकेट स्पर्धेला भेट देत समीर चांदेरे यांनी वाढविला सर्व वयोगटातील खेळाडूंचा उत्साह…