बाणेर :
बाणेर-पाषाण लिंक रोड परिसरातील नागरिकांच्या दीर्घकालीन पाण्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी माजी स्थायी समितीचे अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या प्रयत्नामुळे कलमाडी हाऊस टेकडी लगत असलेली 60 लाख लिटर क्षमतेची नवीन पाण्याची टाकी पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे मेडि पॉईंट हॉस्पिटल परिसर, तेजस्विनी सोसायटी, एकदंत सोसायटी, शंभू विहार सोसायटी, सदाफुली पार्क, भवानी पार्क, दर्शन पार्क, विजय नगर, दत्त नगर, त्रिमूर्ती नगर, द नेस्ट सोसायटी आणि पल्लोड फार्म,बाणेर पाषाण लिंक रोड या भागातील पाण्याचा प्रश्न लवकरच सुटणार आहे.
पूर्वी बाणेर पाषाण टेकडीवरील टाकीमधून या भागाला पाणीपुरवठा होत होता, मात्र नवीन टाकीमुळे हा भाग स्वतंत्र होईल. परिणामी, बाणेर टेकडीवरील तसेच पॅनकार्ड क्लब येथील असणाऱ्या दोन टाकीचे पाणी फक्त बाणेरसाठी उपलब्ध होईल आणि अधिक प्रेशरने पुरवठा होऊन नागरिकांना दिलासा मिळेल याची माहिती एल अँड टी कंपनीच्या लाईन मॅनेजमेंट विभागाचे वरिष्ठ अभियंता श्री. प्रतीक घरत सर आणि श्री. निखिल सिंह सर यांच्यासोबत १९ नोव्हेंबर ला सविस्तर बैठक घेऊन दिली व राहिलेले काम त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने प्रत्यक्षात हा पाणी प्रश्न मार्गी लागत आहे. – समीर चांदेरे (युवक अध्यक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर)
नवीन टाकीच्या पाण्याचे प्रत्येक एरिया नुसार पाण्याचे टेस्टिंग सुरू झाले असून लवकर सगळीकडे पाणी सुरळीत होणार आहे.
More Stories
बालेवाडी येथील एसकेपी कँपस मध्ये ज्येष्ठ नागरिक महासंघाची गायन स्पर्धा संपन्न..
बालेवाडी हायस्ट्रीट येथे जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशन आणि वाहतूक नियंत्रण शाखा, बालेवाडी पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या पादचारी दिन साजरा करण्यात येणार..
सुसगाव मध्ये शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा…