December 12, 2024

Samrajya Ladha

बालेवाडी येथील एसकेपी कँपस मध्ये ज्येष्ठ नागरिक महासंघाची गायन स्पर्धा संपन्न..

बालेवाडी :

ज्येष्ठ नागरिकांसाठी पहिल्यांदाच आयोजित गायन स्पर्धेला औंध, बालेवाडी, बाणेर आणि पाषाण या भागातून उत्कृष्ट प्रतिसात मिळाला असून अशा स्पर्धा दरवर्षी आयोजित करु असा निर्धार ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष ॲड.एस.ओ. माशाळकर यांनी व्यक्त केला. बालेवाडीतील एसकेपी कँपसमध्ये नुकत्याच आयोजित गायान स्पर्धेमध्ये एकूण १३ संघाचे मिळून २२ गायकांनी सहभाग नोंदविला. या गायन स्पर्धेचे उद्घाटन श्री.गणपतराव बालवडकर, संस्थापक अध्यक्ष, एसकेपी कँपस, बालेवाडी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन करण्यात आला.

या गायन स्पर्धेचे प्रथम क्रमाकांचे विजेते नवचैतन्य हास्ययोग परिवार, मुरकुटे गार्डन शाखा, बाणेर येथील
श्री.शरद चोंच यांनी पटकावले.
द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक सौ.कल्पना साळुंके, बाणेर यांनी मिळविला तर तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषीक श्री.भास्कर पाटील, औंध यांना मिळाला.

बक्षिस विजेत्यांचा सन्मान प्रमुख पाहुणे गणपतराव बालवडकर, ॲड.एस.ओ.माशाळकर, महासंघाचे कार्याध्यक्ष प्रा.पद्माकर पुंडे, उपाध्यक्ष हरिष पाठक, सचिव सुर्यकांत कलापुरे, खजिनदार शरदकुमार जाधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुजाता लिमये यांनी केले. गाण्याच्या स्पर्धेला टेक्निकल सपोर्ट डाॕ.सुधीर निखारे, श्री.सतीष पाठक यांचे होते.

कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती रमेश गोरंटीवार, रेखा मसुरकर, डाॕ.रमेश वझरकर, सीए.अशोक नवाल, ॲड.परशुराम तारे, पद्माकर राऊत, सुधीर ऊसवाडकर, गणेश अलोने, जयश्री देशपांडे, निरामयचे जामखंडे, रत्नाकर मानकर, दिलीप फलटणकर, राजश्री बोरकर, चित्रा काळे, माधुरी इंगळे यांची होती.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवचैतन्य ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांनी विषेश परिश्रम घेतले.