December 12, 2024

Samrajya Ladha

बालेवाडी हायस्ट्रीट येथे जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशन आणि वाहतूक नियंत्रण शाखा, बालेवाडी पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या पादचारी दिन साजरा करण्यात येणार..

बाणेर :

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे कोथरूड विधानसभा कार्याध्यक्ष, मा. श्री. जयेश मुरकुटे यांच्या संकल्पनेतून, जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशन आणि वाहतूक नियंत्रण शाखा, बालेवाडी पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी सकाळी सहा ते आठ यावेळेत बालेवाडी हायस्ट्रीट या ठिकाणी पादचारी दिन साजरा करण्यात येणार आहे.

यानिमित्ताने बालेवाडी हायस्ट्रीट 1 आणि हायस्ट्रीट 2 दरम्यानचा रस्ता वाहनमुक्त ठेवण्यात येणार असून हा रस्ता केवळ चालणाऱ्यांसाठी मोकळा ठेवण्यात येणार आहे. बाणेर, बालेवाडी आणि परिसरातील असंख्य नागरिक या उपक्रमात सहभागी होणार आहेत.

पादचाऱ्यांच्या हक्कांचे रक्षण, सुरक्षितता, आणि त्यांच्या गरजांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. याचा मुख्य उद्देश वाहनांमुळे पादचाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या दूर करणे आणि रस्त्यावरील चालणाऱ्यांच्या सुरक्षिततेला प्रोत्साहन देणे आहे.

या उपक्रमात बाणेर, बालेवाडी आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.