December 12, 2024

Samrajya Ladha

सुसगाव मध्ये शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा…

सुस :

सुसगावातील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरामध्ये शिवप्रताप दिन म्हणजेच मातृ-पितृ इच्छापूर्ती दिन अफजलखान वधाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सुस गावातील शिवभक्त युवकांनी एकत्र येत हा दिवस साजरा केला.

सुस गावातील युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करण्यासाठी गावामध्ये रॅली काढली. या रॅली मध्ये विविध फलक द्वारे नागरिकांची जनजागृती करण्यात आली. शिवप्रताप दिवस सर्वांना लढण्याची प्रेरणा देतो. शत्रू कितीही बलाढ्य असला तरी त्याला नमवण्याची इच्छाशक्ती असल्यास अशक्य काही नसते हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृतीतून आपणास शिकायला मिळते.

यावेळी प्रभात फेरी आणि शिव वंदना घेण्यात आली. शिवरायांचा जयघोष करत घोषणा देण्यात आल्या.