December 12, 2024

Samrajya Ladha

सुस शाखेतील पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये क्रीडामहोत्सवचा जल्लोषात शुभारंभ!!!

पेरीविंकल चे विदयार्थी पुढे जाऊन खेळामध्ये  देशाचे नेतृत्व करतील!!!. – सीताराम तोंडे.

पेरीविंकलच्या विद्यार्थ्यांमध्ये पोलिसखात्यासारखी शिस्त!!!! -पोलिस उपाध्यक्ष – युवराज मोहिते.

सुस :

चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरीविंकल इंग्लीश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या सुस शाखेत अँन्युअल स्पोर्ट्स मीट २०२४-२५  चा शुभारंभ  अत्यंत सळसळत्या उत्साहात करण्यात आला. क्रीडादिनानिमित्त सुंदर सजावट करण्यात आली होती. दिमाखदार पद्धतीने अनार लावून पाहुण्यांचे अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाचा प्रारंभ सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आला होता. यावेळी प्रमुख उपस्थित मान्यवर श्री सिताराम तोंडे पाटील उपाध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस पार्टी पुणे शहर व पोलिस उपाध्यक्ष- पुणे ग्रामीण श्री युवराज मोहिते  तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा श्री राजेंद्र बांदल,संचालिका सौ रेखा बांदल, संस्थेच्या डायरेक्टर शिवानी बांदल तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व उपस्थित पाहुण्यांचा व मान्यवरांचा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री बांदल सर यांच्याकडून शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.दीपप्रज्वलन करून आपले खेळाडू मशाल घेवून आले व मशाल प्रज्वलित करण्यासाठी मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले. सर्व मान्यवरांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करण्यात आली.

स्पोर्ट्स मेक्स मॅन रिफ्रेश असे म्हणून सर्वांनी सुद्रुढ व निरोगी राहणे अत्यंत गरजेचे आहे असे सांगून अभ्यासा बरोबरच खेळाची जोड तितकीच महत्वाची असते असे सांगून खेळाचे महत्व शाळेच्या तरुण तडफदार डायरेक्टर शिवानी बांदल यांनी त्यांच्या भाषणात सांगितले.

तर खेळाने माणूस घडतो बरेच पैलू खेळाने विकसीत होतात त्यामुळे खेळ हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे व खेळासाठी जे काही लागेल ते करण्याची तयारी ठेवली तर अनुकूल परिस्थितीतही सुवर्णं पदक पटकवता येते व लीनता व मेहनत आणि चिकाटी अंगात बाळगली तर उच्च शिखर नक्कीच गाठता येते याचे जिवंत उदाहरण आज सचिन तेंडुलकर व विनोद कांबळी या जोडजोडीचे सर्वांसमोर आहे असे प्रतिपादन पोलिस उपाध्यक्ष युवराज मोहिते यांनी यांच्या भाषणात केले.

तर आनंदी जीवन जगण्यासाठी मन व शरीर निरोगी राहणे गरजेचे आहे.

क्रीडा दिनाचे औचित्य साधून शाळेमध्ये विविध खेळांचे आयोजन करण्यात आले .त्यामुळे  विद्यार्थ्यांमध्ये आनंद आणि उत्साह निर्माण झाला.स्पोर्ट्स डे हा शारिरीक तंदुरुस्ती, टीमवर्क आणि खिलाडूवृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी  साजरा केला जाणारा वार्षिक कार्यक्रम आहे.  हा एक दिवस आहे जेव्हा विद्यार्थी विविध खेळ आणि खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि त्यांच्या क्रीडा कौशल्यांचे प्रदर्शन करण्यासाठी एकत्र येतात.

विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती वाढवणे, टीमवर्क, खिलाडूवृत्ती आणि निष्पक्ष खेळाला प्रोत्साहन  देणे अत्यंत महत्वाचे असते असे सांगून विद्यार्थ्यांना त्यांच्या ॲथलेटिक टॅलेंटचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले यासाठी सर्व शिक्षकांचे आभार मानून एकूणच स्पोर्ट्स डे हा एक मजेदार आणि रोमांचक कार्यक्रम आहे जो विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक फिटनेस, टीमवर्क आणि खिलाडूवृत्तीला प्रोत्साहन देतो असे सीताराम तोंडे यांनी त्यांच्या भाषणात सांगीतले व पेरीविंकल शाळेत अतिथी म्हणून आमंत्रित केल्याबद्दल संस्थेचे व बांदल सरांचे आभार मानून सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी स्पोर्ट डे निमित्त इंडिया डान्स तर आठवीच्या विद्यार्थ्यांनी जय हो या वर रोमांचक असे पिरॅमिड सादर केले.

ज्या विद्यार्थ्यांनी खेळामध्ये तालुकास्तरावर जिल्हास्तरावर प्राविण्य मिळवले आहे. त्यांना मेडल देऊन सर्व मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

क्रीडा दिनाचे आयोजन तीन दिवस असणार आहे.

स्पोर्ट्स डे चे औचित्य साधून एक आगळा वेगळा उत्साही वातावरणात मान्यवरांच्या हस्ते शाळेचा झेंडा मानाने फडकाऊन व राष्ट्रगीताने ओपनिंग सेरेमनी करण्यात आली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी खेळ प्रतिज्ञा घेतली. त्यानंतर भूमीपूजन करून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते खो-खो च्या ओपनिंग मँच साठी फीत कापून क्लेपर वाजऊन  मँच चा प्रारंभ करण्यात आला. सर्व खेळाडूंना मान्यवरांनी उत्तेजीत करून त्यांचा गौरव केला. त्यानंतर इनडोअर गेम्स चे ओपनिंग मान्यवारांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.

या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन हे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. राजेंद्र बांदल सर, संचालिका रेखा बांदल व शिवानी बांदल यांच्या अध्यक्षतेखाली शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षिका नेहा माळवदे व सचिन खोडके तसेच क्रीडा शिक्षिका शैला परुळेकर व ज्ञानेश्वर मोरे यांच्या सहकार्याने व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मदतीने  खेळाचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने साजरा झाला. रांगोळी रेखाटन, फलक लेखन, सजावट या कामात सर्वांनीच हातभार लावला.

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ प्रफुल्ला पाटील व अमिता जॉनी यांनी केले.