December 18, 2024

Samrajya Ladha

बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे परीसरात श्री दत्त जयंतीच्या निमित्ताने समीर चांदेरे यांनी साधला नागरिकांशी संवाद..

बाणेर :

बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे परीसरात श्री दत्त जयंतीच्या निमित्ताने विविध ठिकाणी श्री दत्तजयंती उत्सव मोठया भक्ती भावाने साजरा करण्यात आला. यावेळी प्रभागात ठीकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांनी भेट देत मंदिरांमध्ये आयोजिलेल्या आरती व धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतला.

 

आपल्या परिसरातील नागरीक ठिकठिकाणी श्री दत्तजयंती उत्सव मोठया उत्साहात साजरा करतात. या उत्सवात सहभागी होऊन नागरीकांच्या भेटी घेत त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर योग्य तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार असून येणाऱ्या पुढील काळात श्री दत्त महाराजांचा आशीर्वादाने प्रत्येकाच्या जीवनात सकारात्मक बदल घडावा अशी प्रार्थना करतो. तसेच प्रभागातील प्रत्येक दत्त भक्ताचे प्रेम व सहकार्य हे माझ्यासाठी नेहमीच प्रेरणादायी आहे. श्री दत्तात्रेय महाराजांचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर सदैव राहो, हीच शुभेच्छा – समीर चांदेरे (युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर)