December 18, 2024

Samrajya Ladha

म्हाळुंगे येथील पुराणिक सोसायटी मधील क्रिकेट स्पर्धेला भेट देत समीर चांदेरे यांनी वाढविला सर्व वयोगटातील खेळाडूंचा उत्साह…

म्हाळुंगे :

म्हाळुंगे येथील पुराणिक सोसायटी मध्ये सर्व वयोगटांतील सदस्यांना एकत्र आणून क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेने पुणे शहर युवक काँग्रेस अध्यक्ष समीर चांदेरे या स्पर्धेला भेट देत सोसायटीच्या नागरिकांचा उत्साह वाढविला.

 

लहान मुले, पुरुष आणि महिलांसाठी वेगळ्या गटांमध्ये आयोजित केलेल्या या स्पर्धा कौतुकास्पद आहेत. महिलांचा सहभाग आणि त्यांचा उत्साह पाहून खूप अभिमान वाटला. अशा उपक्रमांमुळे समाजामध्ये सकारात्मकता निर्माण होते आणि प्रत्येकाला आपली क्षमता दाखवण्याची संधी मिळते. अशा सुंदर उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल पुराणिक सोसायटीच्या नागरिकांचे मनःपूर्वक आभार
समीर चांदेरे (युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर)