नागपूर :
भोर – मुळशी – राजगड विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामासंदर्भात केंद्रीय दळणवळण मंत्री ना श्री नितीन गडकरी साहेब यांची आमदार शंकर भाऊ मांडेकर आणि बाणेर बालेवाडी परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विशाल विधाते यांनी नागपूर येथे भेट घेत राष्ट्रीय महामार्ग 48 नऱ्हे ते रावेत चा सर्व्हिस रोड रुंदीकरण करण्यात येऊन राज्य मार्ग 130 घोटावडे, हिंजवडी, मारुंजी, कासरसाई रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात यावे यासंदर्भात निवेदन देण्यात आले.
भोर – मुळशी – राजगड विधानसभा मतदार संघा मधून निवडून आल्यानंतर शंकर भाऊ मांडेकर यांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून हालचाली सुरू केल्या आहेत. बाणेर, बालेवाडी, सूस, म्हाळुंगे, हिंजवडी, बावधन परिसरातील नागरिकांची खूप वर्दळ हायवे लगत असणाऱ्या सर्विस रस्त्यांनी सुरू असते. त्यामुळे नागरिकांना ट्रॅफिक समस्येला तोंड द्यावे लागते. ट्रॅफिक मुळे नागरीक हैराण असून त्यावर उपाय योजना व्हावी म्हणून केंद्रीय दळणवळण मंत्री ना श्री नितीन गडकरी साहेब यांची भेट घेऊन सदर प्रश्न मार्गी लावले जावेत म्हणून निवेदन देण्यात आले.
येणाऱ्या पुढील काळात सर्विस रस्ता संबंधित प्रश्न निकाली निघून नागरिकांना खूप मोठा दिलासा मिळेल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विशाल विधाते यांनी दिली.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी