May 20, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

जेष्ठ नागरीक बालेवाडी चैतन्य गायक कट्ट्याचा वर्धापन दिन सोहळा संपन्न..

बालेवाडी :

बालेवाडी येथे जेष्ठ नागरीक बालेवाडी चैतन्य गायक कट्ट्याचा वर्धापन दिन सोहळा राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष राहुलदादा बालवडकर यांच्या विशेष सहकार्याने संपन्न झाला.

 

ज्येष्ठांनी एकत्र येत आपल्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून सुरू केलेला गायक कट्टा प्रथम वर्धापन दिन साजरा करण्यात आला. उपस्थित सर्व सभासदांचे प्रयत्न आणि सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वी झाला.

या सोहळ्या प्रसंगी ७५ वर्षे पार केलेल्या तीन ज्येष्ठ सदस्यांचा सन्मान सोहळा, सोसायटी तील एक ज्येष्ठ महिला आणि तीन कट्टा सदस्य यांचे वाढदिवस, आणि एकूण १८ सदस्यांची गाणी ह्यांचा समावेश करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी सर्व सभासदांसोबत सन्मानीय राहुलदादा बालवडकर यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच कार्यक्रमाला प्रमूख पाहुणे म्हणून उपस्थित राहून सर्वांचा उत्साह वाढविला म्हणून आयोजकांनी त्यांचे आभार मानले.