May 30, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सूस ग्रामस्थांनी अजित दादा पवार यांचा विक्रमी सहाव्यांदा उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल केला सन्मान..

पुणे :

विधानसभा निवडणूक निकाल लागल्यानंतर काल अजित पवार यांनी यावेळी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा विक्रम केला आहे. त्यांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यानिमित्त सूस ग्रामस्थांच्या वतीने माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली व भोर,राजगड, मुळशी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार शंकर भाऊ मांडेकर यांच्या उपस्थितीत अजित दादा पवार यांचा सन्मान करण्यात आला.

 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अनेक वेळा सुस परिसरासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देत विकास कामे मार्गी लावली आहे. त्यामुळे सूस ग्रामस्थांनी विधानसभा निवडणुकीत शंकर भाऊ मांडेकर यांना मोठे मताधिक्य मिळवून दिले. म्हणूनच येणाऱ्या पुढील काळात देखील गावातील विविध अडचणी सोडविण्यासाठी अजित दादा भरघोस निधी उपलब्ध करून देतील अशी खात्री ग्रामस्थांनी व्यक्त केली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नितीन मामा चांदेरे, माजी चेअरमन गणेश सुतार, सुखदेव चांदेरे, चंद्रकांत काळभोर, दीपक बांदल, सचिन चांदेरे, सुधीर सुतार, दिपक चांदेरे, प्रभंजन फणसे, संदीप चांदेरे आदी उपस्थित होते.