November 21, 2024

Samrajya Ladha

भोर, राजगड, मुळशीतील सर्व पैलवान, वस्ताद करणार शंकर भाऊ मांडेकर यांचा प्रचार..

भुकूम :

भोर, राजगड, मुळशीतील सर्व वस्ताद मंङळी, सर्व पैलवान यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री शंकरभाऊ मांङेकर जाहिर पाठिंबा देण्यासाठी भुकूम येथे स्नेहमेळावा आयोजित केला होता, पैलवान, वस्ताद मंङळीनी पाठिंबा दिला. राजकीय आखाड्यात शंकरभाऊ मांडेकर यांच्यासाठी मैदानात उतरणार असल्याचे सांगितले.

शंकर भाऊ मांडेकर हे स्वतः पैलवान असल्याने पैलवानांच्या समस्या त्यांना चांगल्या पद्धतीने माहित आहेत. ते नेहमीच पैलवान च्या मदतीला धावून येतात. पैलवानांचा आवाज म्हणून ते काम करतील म्हणूनच त्यांना भोर, राजगड, मुळशीतील पैलवानांनी पाठिंबा दर्शविला आहे. त्यांच्याकरिता सर्व मंडळी प्रचारात उतरणार आहे.

मी देखिल एक पैलवान असून राजकीय आखाड्यातील कुस्ती मारण्यासाठी मी आपल्या सर्वांच्या साथीने सज्ज आहे. भोर राजगड मुळशीतील कुस्तीची परंपरा जुनी असून नव्या पिढीमध्ये हा खेळ रुजवण्यासाठी नवीन मल्ल घडविण्यासाठी आवश्यक काम मी करणार आहे. कुस्ती पैलवानांच्या समस्या सोडविण्यावर माझा भर राहील
शंकरभाऊ मांडेकर
उमेदवार भोर राजगड मुळशी विधानसभा

यावेळी छत्रपती पुरस्कार विजेते कैलास मोहोळ, महाराष्ट्र चॅम्पियन बाळासाहेब बुचडे, पीएसआय विठ्ठलराव जांभुळकर, विजय साखरे, दत्ता मोहोळ, दिलीप भरणे, भरत किनाळे, विक्रम पवळे, विक्रम पारखी, बाबासाहेब कंधारे, संदीप वांजळे, राजू मते, बाबा चोरगे, शांताराम इंगवले, दत्ता मोहोळ, विलास भिलारे, पांडुरंग खानेकर, किसन नांगरे, अबू माझीरे, अण्णा पवळे, दिगंबर केदारी, गोविंद आंग्रे, महेश मोहोळ (उपमहाराष्ट्र केसरी), पंकज हरपुडे भूषण शिवतारे गणेश आबा कंधारे समीर कोळेकर, संतोष दगडे, अमित पवळे, गणेश मारणे, प्रमोद मांडेकर, रमेश पवळे सचिन शिंदे, मुन्ना झिंजुर्के, हेमंत माझिरे, हिरामण गोडांबे, हनुमंत नागरे, मारुती वर्पे, कैलास चोंधे, प्रकाश भेगडे, प्रकाश मातेरे, राजू तांगडे, चंद्रकांत मोहोळ आदी पैलवान मंडळी उपस्थित होती.