May 25, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर बालेवाडी परिसरात मनसे उमेदवार ॲड किशोर शिंदे यांना वाढता पाठिंबा…..

बाणेर :

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार ॲड किशोर शिंदे यांनी आज बाणेर बालेवाडी परिसरातील दत्त नगर, विधाते वस्ती आणि दर्शन पार्क परिसराला भेट दिली.

 

झपाट्याने विकसित होणाऱ्या या परिसरामध्ये अजूनही येथील नागरिक अनेक मूलभूत सुविधा मिळवण्यापासून वंचित आहे. आजवर सत्ताधाऱ्यांनी केवळ दिखावा करून विकास कामे केल्याचा कांगावा केला आहे. या परिसरामध्ये वाढत्या लोकसंख्येनुसार पर्यायी सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत. तिथे पूर्वीच्या समस्या आजही आहेत तशाच आहेत. यावर आज कुठल्याही लोकप्रतिनिधी ठोस उपाययोजना केलेली नाही. अनेक स्थानिक नागरिकांनी किशोर शिंदे यांना ही बाब निदर्शनास आणून दिली.

नागरिकांशी समन्वय साधत असताना येणाऱ्या काळात मी नक्कीच आपल्या समस्या सोडवून आपल्याला मूलभूत सोयी सुविधा मिळवण्यासाठी कटीबद्ध राहील अशी ग्वाही देतो – ॲड. किशोर शिंदे 

परिसरातील नागरिकांनी देखील किशोर शिंदे यांना आपला जाहीर पाठिंबा दर्शवत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी मनसेचे अनिकेत मुरकुटे, सुहास निम्हण, मयूर सुतार शिवम दळवी, निलेश जुनवणे, अमर अडागळे, चेतन धोत्रे, विशाल कळमकर, यश विधाते, मयूर बोलाडे आणि नागरीक सहभागी झाले होते.