June 8, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बालेवाडी येथे लहू बालवडकर यांच्या वतीने चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रचारार्थ एका दिवसात विक्रमी 1987 मतदान स्लीप वाटप..

बालेवाडी :

बालेवाडी येथील लहू बालवडकर सोशल वेल्फेअर आयोजित श्री स्वामी समर्थ शेतकरी आठवडे बाजार येथे भाजपा चिटणीस लहू बालवडकर यांच्या वतीने महायुतीचे उमेदवार चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रचारार्थ एका दिवसात विक्रमी 1987 मतदान स्लीप वाटण्यात आल्या आणि दोन नंबरचे कमळ चिन्हासमोरील बटण दाबून चंद्रकांत दादा यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे नागरिकांना आव्हान करण्यात आले.

 

विधानसभा निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आला असून महायुतीचे भाजपा उमेदवार चंद्रकांत पाटील यांना विक्रमी मतांनी निवडून आणण्यासाठी लहू बालवडकर यांनी कार्यकर्त्यांसोबत जोरदार प्रचार सुरू केला असून जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान सहभाग घेऊन दोन नंबरचे कमळ चिन्हासमोरील बटण दाबून चंद्रकांत दादांना मतदान करण्याचे आव्हान केले.

चंद्रकांत दादा पाटील यांनी गेली पाच वर्षात कोथरूड विधानसभा मतदारसंघात केलेल्या कामाची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवत दादांचा प्रचार करण्यात आला. चंद्रकांत दादा सारखे व्यक्तिमत्व आपल्याला लाभले हे आपले भाग्य असून आपल्या परिसराचा विकास करण्यासाठी त्यांना विक्रमी मतांनी निवडून आणण्याची आपली जबाबदारी आहे. नागरिकांमध्ये जाऊन प्रचार करत असताना दादांबद्दल नागरिकांचे प्रेम पाहता ते विक्रमी मतांनी निवडून येतील याची खात्री आहे.
लहू गजानन बालवडकर
चिटणीस भाजपा पुणे शहर