भोर :
भोर-राजगड-मुळशी मतदार संघात सुरू असणारे निवणुकीचे वारे जोरदार वाहत असून जसजशी मतदानाचा दिवस जवळ येत आहे तसतसा राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार शंकरभाऊ मांडेकर यांना पोषक वातावरण तयार होताना दिसत आहे. यावेळी काँग्रेसला मोठा खिंडार पडला असून संग्राम थोपटे यांचे कट्टर समर्थक युवा नेते सतीश चव्हाण यांचा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश झाला आहे.
भोर तालुक्यामध्ये मतदानाचा दिवस जसा जवळ येत आहे तसतसे निवडणुकीचे वातावरण अधिक तापू लागले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शंकरभाऊ मांडेकर यांना पोषक वातावरण तयार होत आहे. या वातावरणात मोठी उलट फेर पाहायला मिळत असून युवा नेते सतीश चव्हाण यांच्या प्रवेशामुळे भोर तालुक्यात शंकर भाऊ मांडेकर यांना मोठे बळ प्राप्त झाले आहे.
युवा नेते सतीश चव्हाण यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्याने भोर मध्ये मोठा बदल पाहायला मिळू शकतो. काँग्रेसला पडलेले खिंडार शंकर भाऊ मांडेकर यांच्या पथ्यावर पडण्याचे संकेत मिळत आहेत.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी