June 4, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पेरीविंकल शाळेच्या पौड बावधन ,सुस, कोलवण व माले शाखेत बालदिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन…

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध जादूगार असलम मॅजिशियन यांच्या जादूच्या प्रयोगाचे सर्व विदयार्थी, पालक व ग्रामस्थांनी लुटला मनमुराद आनंद!!!

सूस :

चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या पौड, बावधन ,सुस, कोलवण व माले या सर्व शाखांमध्ये आज गुरुवार दि.१४ नोव्हेंबर रोजी बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

बालदिनाच्या दिवशीचे औचित्य साधून सर्व मुलांसाठी आज वेगवेगळ्या खेळाचे किंवा मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा प्रयत्न सर्व शिक्षकांनी त्यांच्या चिमुकल्यांसाठी केला. लहान मुलांसाठी बालदिन हा विशेष 14 नोव्हेंबरला भारतामध्ये साजरा केला जातो. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मतारखेच्या दिवशी बालदिन साजरा केला जातो.

कार्यक्रमाचा प्रारंभ हा पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेच्या मुख्याध्यापिका निर्मल पंडित यांच्या हस्ते करून करण्यात आला. त्यानंतर शिक्षकांनी व काही विद्यार्थ्यांनी आपल्या सुमधुर आवाजामध्ये मुलांसाठी गीत गायन करून सगळ्यांना मंत्रमुग्ध केले. तसेच मुलांसाठी वेगवेगळ्या खेळांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी बास्केट इन द बॉल, फ्रॉग जंप तसेच कलरिंग ऍक्टिव्हिटी घेण्यात आल्या.

आजच्या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे मॅजिक शो (जादूचा खेळ.,) महाराष्ट्रातील सुप्रसिध्द जादूगार श्री असलम सर यांनी त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारचे जादूचे खेळ करून सगळ्यांनाच अचंबित करून सर्व मुलांचे, पालकांचे व उपस्थितांचे मनोरंजन केले. मुलांनी याचा मनमुराद आनंद लुटला तसेच कार्यक्रम अतिशय उत्साहामध्ये सर्व विद्यार्थी, शिक्षक एकत्र येऊन साजरा केला.

चाचा नेहरूंची वेशभूषा ही अगदी विलोभनीय करण्यात आली. विद्यार्थ्यांनी बालदिनाबद्दल माहिती सांगितली बालदिनानिमित्त बेबीज डे आऊट, लिटिल स्टुअर्ट ,होम अलोन यासारख्या मुव्हीज विद्यार्थ्यांना स्क्रीनवर दाखवण्यात आल्या. सर्व शिक्षकही आज लहान मुलांबरोबर अगदी लहान झाले होते आणि त्यांच्यासोबत लहान होऊन आनंद साजरा करताना दिसत होते.

शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांनी सर्व विद्यार्थ्यांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांना भविष्यात यशस्वी होण्याची शुभकामना दिली.

बालदिन साजरा करण्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंद आणि उत्साह निर्माण झाला. या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी आणि एकतेची भावना निर्माण झाली. चिल्ड्रन्स डे हा दिवस बच्च्यांच्या हक्कांची जागृती करण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणाच्या विकासासाठी साजरा केला जातो . या दिवसाला बच्च्यांना त्यांच्या हक्कांबद्दल आणि त्यांच्या भावी भविष्याबद्दल माहिती देण्यात आली.

चिल्ड्रन्स डे हा दिवस बच्च्यांच्या विकासाच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. आजचा हा चिल्ड्रन्स डे म्हणजे बच्च्यांचा दिवस अर्थात बालदिन हा शाळेमध्ये अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आवडीचा आणि शिक्षणपूर्ण ठरला.

या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राजेंद्र बांदल सर, संचालिका सौ.रेखा बांदल व डायरेक्टर शिवानी बांदल यांच्या अध्यक्षतेखाली पेरीविंकल प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांच्या नेतृत्वाने करण्यात आला. पर्यवेक्षक प्राजक्ता वाघवले, कल्याणी शेळके, इंदू पाटील नेहा माळवदे व सचिन खोडके यांच्या सहकार्याने तसेच सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थीवर्ग यांच्या मदतीने अत्यंत उत्साहात व आनंदात आजचा हा बालदिन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाला. असा हा आजचा बालदिन सर्व विद्यार्थ्यांना ताजेतवाने करून आनंदी वातावरणात सगळ्यांच्याच मनात घर करून गेला. आजच्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे प्रफुल्ला पाटिल, साक्षी इप्ते व संध्या देशमुख यांनी केले.