कोथरूड :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोथरूड विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार ॲड.किशोर शिंदे आपल्या प्रचार शैली मुळे नागरीकांना आपले वाटत आहेत. त्यांनी प्रचारादरम्यान वैयक्तिक भेटीगाठींवर भर दिला आहे.गुरुवारी सकाळी ७ वाजताच त्यांनी भेटीगाठींना सुरुवात केली. कोथरूडच्या नवसह्याद्री सोसायटी कर्वेनगर, मेहंदळे गॅरेज आणि एरंडवणे परिसरातील उद्यानांना त्यांनी भेट दिली. डॉ.शामाप्रसाद मुखर्जी उद्यान, शहीद मेजर ताथवडे उद्यान, स्व.राजा मंत्री उद्यान या उद्यानांमध्ये सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांशी त्यांनी संवाद साधला.
यावेळी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ॲड. शिंदे यांना मिळाला. नागरिकांनी त्यांचे मोठया उत्साहात स्वागत करत आपुलकी जपली. परिसरात केलेली विविध कामांची नागरिकांनी स्वतःहून प्रशंसा केली. तसेच या विधानसभेमध्ये आपण एक विश्वासार्ह चेहरा म्हणून समोर येत आहात.
मनसे उमेदवार अँड. किशोर शिंदे यांचा प्रभाव यावेळी उपस्थित नागरिकांमध्ये पाहायला मिळाला. शिंदे यांनी केलेल्या कामामुळे कौतुकाची थाप यावेळी नागरिकांनी दिली. आम्ही राज साहेबांची सर्व भाषणे आम्ही अगदी मन लावून ऐकतो, त्यांच्या भाषणांनी आम्ही सर्वजण प्रभावित झालो आहोत,यंदा आम्ही राज साहेबांच्या पाठीशी उभे राहणार असल्याच्या भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केल्या.
कोथरूड विधानसभेमध्ये नागरिकांचे दिवसेंदिवस मला मिळत असलेले प्रेम आणि माझ्याकडून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी असणाऱ्या अपेक्षा मी निश्चितच आमदार म्हणून निवडून आल्यावर पूर्ण करेल.
– ॲड. किशोर शिंदे
मनसे उमेदवार
कोथरूड विधानसभा
यावेळी किशोर शिंदे यांच्या समवेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रभाग क्र १३ मधील विभाग अध्यक्षा सुरेखाताई होले, दत्ता पायगुडे, गणेश शेडगे, योगेश वाव्हळ, राजेश शिगवण, हर्षद खाडे, अनिता शिंदे, उषा आवळे, गीता वायचाल इत्यादी सह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
More Stories
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, माळुंगे व औंध परिसरात शंभर टक्के मतदान व्हावे म्हणून प्रबोधन मंचाने राबविली जनजागृती मोहीम..
100% मतदानाकरीता बाणेर-बालेवाडी रिक्षा संघटनांचा पुढाकार…
बालेवाडी येथे चंद्रकांतदादांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा कवितेतून संकल्प..