January 29, 2025

Samrajya Ladha

बाणेर बालेवाडी परिसरात महायुती उमेदवार चंद्रकांत दादा पाटील यांना विक्रमी मताधिक्य मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अग्रेसिव्ह, जोरदार प्रचार सुरू..

बाणेर :

कोथरुड विधानसभेचे महायुतीची अधिकृत उमेदवार मा.चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रचारार्थ पुणे मनपाचे माजी स्थायी समिती अध्यक्ष राष्ट्रवादी नेते मा.बाबुरावजी चांदेरे साहेबांच्या पुढाकाराने बाणेर मधील दत्तनगर परिसर सोसायटी फोरम मधील विविध सोसायट्यांची संयुक्त बैठक पार पडली.

 

महायुतीचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत दादा पाटील यांच्या विजयाकरिता राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग क्रमांक 9 मधून अग्रेसिव्ह भूमिका दिसत असून दादांना विक्रमी मतांनी विजयी करण्यासाठी बाणेर बालेवाडी परिसरात विविध सोसायट्यांमध्ये प्रचार करत जास्तीत जास्त मतदान महायुतीचे उमेदवार चंद्रकांत दादा पाटील यांना कसे मिळवता येईल यासाठी प्रयत्न करत आहेत.

यावेळी कोथरुड विधानसभेचे महायुतीचे उमेदवार मा.चंद्रकांतदादा पाटील, भाजपचे मुख्य प्रवक्ते मा.माधव भंडारी, भाजप पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, राहुलदादा बालवडकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष समीर चांदेरे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी पाटोळे सर, माणिकतात्या गांधीले यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

कोथरूड विधानसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत दादा पाटील यांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणावे या दृष्टीने आमचा प्रयत्न असून तसे नियोजन राष्ट्रवादी काँग्रेस बाणेर बालेवाडी च्या वतीने लावण्यात आले आहे. परिसरातील विविध सोसायटी मतदारांशी संपर्क करत महायुतीच्या उमेदवार दादांचा प्रचार करत असून ते विक्रमी मतांनी विजयी होतील याची खात्री आहे.
समीर चांदेरे
युवक अध्यक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर

बैठकीदरम्यान फोरममधील सोसायट्यांचे सर्व सन्माननिय चेअरमन, सेक्रेटरी व कार्यकारिणी सदस्य तसेच नागरिकांनी आपल्या प्रभागासह कोथरुड विधानसभेच्या सर्वांगीण विकासासाठी मा.चंद्रकांतदादा पाटील यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा निश्चय केला.

You may have missed