पुणे :
पुणे जिल्हा ग्रामीण व शहरातील पुण्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ एस पी कॉलेज मैदानावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भव्य सभा संपन्न झाली. यावेळी भोर-राजगड-मुळशी चे महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधानसभा निवडणुकीत विजयी होण्याच्या उमेदवारांना शुभेच्छा देत महायुतीच्या अधिकृत उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आव्हान मतदारांना केले.
यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महायुती सरकार राबवित असलेल्या योजनांची माहिती दिली. मतदारांनी मतदान करताना विकासाच्या दृष्टीने नागरिकांचे हित झोपासणारे महायुती सरकार यावे म्हणून महायुतीचे सर्व अधिकृत उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून द्यावेत अशे आव्हान केले.
यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, महायुतीचे सरकार पुणे आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी आणखी जोरात काम करणार आहे. येणारे पाच वर्ष हे विकासाच्या दृष्टीने उड्डाण घेणारे असेल. पुण्यातील नागरिकांना सशक्त करण्यासाठी शहरात गुंतवणुकीसोबतच त्यांना पायाभुत सुविधा, औद्योगिकरण केले जाईल. त्यासाठी आम्ही प्रत्येक गोष्टीवर काम केले आहे. महाराष्ट्रात परकीय गुंतवणुकीत विक्रमी वाढ झाली असून, त्यात पुण्यात मोठी गुंतवणुक होत आहे,” असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
आज एकादशी आहे. एकादशी म्हंटल्यानंतर पालखी सोहळा आठवतो, त्यासाठी या पालखी मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. वारकऱ्यांसाठी हा मार्ग पालखी मार्गाचे म्हणजे, ही समर्पित सेवा आहे” असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील भाषणामध्ये व्यक्त केले.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी