सोमेश्वर वाडी :
सोमेश्वर वाडी येथील मनपा शाळा क्रमांक 11 कै.पद्मभूषण वसंत दादा पाटील प्राथमिक विद्यालय येथे उचाळे साहेब व मेमान मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृती करण्याकरिता शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांची पालक सभा घेण्यात आली.
सभेचे अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा चौधरी या होत्या. यावेळी लाटे सर यांनी मतदार जनजागृती विषयी विविध उपक्रमांची माहिती सांगितली. मनीषा केतकर यांनी विद्यार्थ्यांकडून मतदार जनजागृती पथनाट्याचे सादरीकरण करून घेतले.
यावेळी मुख्याध्यापिका चौधरी मॅडम, घुले सर, उचाळे सर यांनी पालकांना मतदानासंदर्भात मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या मतदान जनजागृती स्पर्धेमध्ये नंबर मिळविलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अन्सर सय्यद व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा मम्हाने यांनी तर आभार प्रदर्शन कुसुम पारधी यांनी केले.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी