घोटावडे :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तथा महायुतीचे भोर-राजगड-मुळशी विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्री. शंकर मांडेकर यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची सभा नागरीकांच्या प्रचंड प्रतिसादात संपन्न झाली.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, महिला सक्षमीकरण व सबलीकरणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. २०२९ पर्यंत विधानसभेत ९६ महिला लोकप्रतिनिधी सेवा देतील. बँका आणि साखर कारखाने प्रभावीपणे हाताळण्यामध्ये विरोधक अयशस्वी ठरलेत. ते समाजाची सेवा कशी करू शकतील? तुम्हा सर्वांची सेवा करणं हे मी माझं कर्तव्य समजतो. आम्ही रिंग रोड प्रकल्पावर काम करत आहोत. २०२९ मध्ये पुण्यात १० विधानसभा मतदारसंघ असू शकतात.
पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी प्रत्येक व्यवहार्य पाऊल उचललं आहे. मी या जिल्ह्यात माझं काम सुरू केलं तेव्हा डीपीडीसी ४० कोटींवर होतं. आता मी ते १२५० कोटींवर अपग्रेड केलं आहे. जर मी कमी पडलो किंवा काही चुका झाल्या तर तुम्हा सर्वांचं मार्गदर्शन घेत आलो असे यावेळी अजिदादांनी सांगितले.
दादा म्हणाले आम्ही सुरू केलेली लाडकी बहीण योजना राज्यात अतिशय लोकप्रिय ठरली. भगिनींना मोठा लाभ झाला. शेतकऱ्यांना वीज बिल माफी आम्ही देऊ केली. आपल्याला रहदारीची समस्या सोडवण्याची गरज आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत तुम्ही शंकर मांडेकर हा उमेदवार निवडून दिल्यास या भागातील विकासासाठी ५ हजार कोटींहून अधिक निधी उपलब्ध करून देईन. मी तुमच्यासाठी काम करण्यास आणि माझी सर्व वचनं पूर्ण करण्यास वचनबद्ध आहे.
यावेळी शंकर मांडेकर म्हणाले, “आमदारांना खासगी कामांसाठी जागा मिळतात, पण जनतेच्या कामासाठी त्यांना जागा मिळत नाहीत. प्रत्येक तालुक्यात ते वेगळी भूमिका घेतात. रायरेश्वराच्या मंदिराची दुरवस्था झालेली असून, गंजलेले पत्रे त्यांना बदलता आलेले नाहीत. राजगडावर जायला नीट रस्ता नाही. ते आश्वासने देऊन केवळ दिशाभूल करतात. आता एमआयडीसी करू म्हणतात, मग एवढे वर्ष सत्ता असताना कोणी हात बांधले होते का ?” म्हणून विकास कामे मार्गी लावण्यासाठी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला बळ देउन संधी द्यावी
यावेळी शरद ढमाले, रणजित शिवतरे, राजेंद्र हगवणे, बाबूराव चांदेरे, बाळासाहेब चांदेरे, सुनील चांदेरे, प्रमोद निम्हण, पूनम विधाते, राजेंद्र बांदल, भगवान पासलकर, विक्रम खुटवड, भालचंद्र जगताप, रेवणनाथ दारवटकर, चंद्रकांत बाठे, संतोष घोरपडे, जीवन कोंडे, दशरथ जाधव, सुनील गायकवाड, किरण राऊत, श्रीकांत कदम, राजाभाऊ वाघ, गोविंद निकाळजे, शांताराम इंगवले, रवींद्र कंधारे, अंकुश मोरे, दीपक करंजावणे, सागर साखरे, अमित कंधारे उपस्थित होते.
More Stories
सोमेश्वर वाडी येथील मनपा शाळा क्रमांक 11 मध्ये पालक सभा घेत करण्यात आली मतदार जनजागृती…
भोर-राजगड-मुळशी चे महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या विजयी होण्याच्या शुभेच्छा..
बाणेर बालेवाडी परिसरात महायुती उमेदवार चंद्रकांत दादा पाटील यांना विक्रमी मताधिक्य मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अग्रेसिव्ह, जोरदार प्रचार सुरू..