December 5, 2024

Samrajya Ladha

रामनदी स्वच्छता अभियान सोमेश्वरवाडी तर्फे जिजामाता कुंडावर, सोमेश्वर मंदिराच्या मागे “दीपोत्सव” मोठ्या उत्साहात साजरा..

सोमेश्वरवाडी :

दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील राम नदी स्वच्छता अभियानांतर्गत सोमेश्वर वाडी येथे दीपोत्सव साजरा करण्यात आला. नेहमीं प्रमाणे मोठ्या उत्साहात राम नदी स्वच्छता अभियान कार्यकर्त्यांच्या वतीने नागरिकांना सोबत घेऊन सोमेश्वर मंदिर पाठीमागे जिजामाता कुंडावर दीपोत्सव साजरा करण्यात आला.

दिवाळी पाडवा निमित्त राम नदी स्वच्छता अभियान कार्यकर्ते आणि नागरिक दरवर्षी एकत्र येऊन परिसर स्वच्छ्ता करत दिवे लावत दीपोत्सव साजरा केला. यावेळी राम नदी स्वच्छता अभियानाची माहिती यावेळी देण्यात आली. संपूर्ण परिसर दीपोत्सव मुळे दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला होता. उजळलेल्या दीपोत्सव प्रमाणे नदी देखील उजळून स्वच्छ व्हावी अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.

यावेळी मधुकर दळवी, रजनी शिरसाट, रवींद्र जोरे, दीपक जाधव, ब्रिजेश दीक्षित, मंदार दीक्षित, विजय डाळिंबकर, चंद्रकांत जाधव, सविता जाधव, गंगा दीक्षित आदी उपस्थित होते.

You may have missed