May 20, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

छत्रपती शिवाजीनगर मतदार संघाचे महविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट यांचा मतदारसंघातील बहिनींसाठी अनोखा संकल्प..

पुणे :

छत्रपती शिवाजीनगर मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट यांचा मतदारसंघातील बहिनींसाठी अनोखा संकल्प केला आहे. त्यांचा हा संकल्प लक्ष वेधत आहे.

संकल्प करताना दत्ताभाऊ बहिरट यांनी म्हंटले की, आज भाऊबीजेच्या मंगलमय आणि पवित्र दिवशी तुझे प्रेम आणि तुझ्या मनातील भाऊरायाचे स्थान जाणवले. तुझा शांत, सात्विक चेहरा माझ्यासाठी अनमोल आहे. तू मला ओवरताना मनापासून दिलेला आशीर्वाद सतत पुढे जाण्याची प्रेरणा देतो.

यंदाच्या भाऊबीजेला मी तुला कोणतेही वस्त्र साडी किंवा कोणतीही वस्तू भेट देणार नाही. यंदा मी त्याहीपेक्षा अधिक मोठा संकल्प केला आहे. माझ्या मतदारसंघातील प्रत्येक घरातल्या बहिणीसाठी या समाजाच्या ताईसाठी दत्ताभाऊ नेहमी खंबीरपणे उभा राहणार आहे. प्रत्येक ताईच्या रक्षणासाठी गरजेच्या वेळी सुखदुःखात सहभागी होण्यासाठी मी सदैव तत्पर राहील.

 

कोणत्याही बहिणीला कामाच्या ठिकाणी घरी किंवा समाजात कोणताही त्रास होऊ नये. आज तुझ्या भावाचा संकल्प आहे तसेच माझी ही बांधिलकी आहे की झोपडपट्टी वस्ती किंवा इमारती फ्लॅटमध्ये राहणाऱ्या प्रत्येक बहिणीची काळजी घेणे हीच माझी ओवाळणी आहे.

ताई तुझ्या इच्छा मागण्या संकल्प या भावापर्यंत पोहोचव कारण तुझ्या प्रत्येक स्वप्नाची पूर्ती करण्यासाठी तुझं प्रत्येक स्वप्न साकार करण्यासाठी तुझा दादा कायम पाठीशी राहील.

सदैव तुझ्या पाठीशी असणारा तुझाच दत्ताभाऊ