May 19, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर येथे सौ. पूनम विशाल विधाते यांच्या निवासस्थानी विधानसभेचे महायुतीचे उमेदवार व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची सदिच्छा भेट..

बाणेर :

कोथरूड विधानसभेचे महायुतीचे उमेदवार व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी पुणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या कार्याध्यक्ष सौ. पूनम विशाल विधाते यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

 

चंद्रकांत दादा पाटील यांच्या कार्यशैलीतून मिळालेल्या प्रेरणेमुळे विकासाच्या दिशेने वाटचाल करण्याची उर्मी अधिक वाढली. जनसेवेची भावना दृढ करत, त्यांनी आगामी कार्यात यश, प्रगती आणि समाजसेवेसाठी मनोबल वाढवण्याच्या शुभेच्छा दिल्या. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत दादा पाटील यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळावे म्हणून महायुतीचा घटक पक्ष यानात्याने पुर्ण ताकदीनिशी प्रयत्न करणार आहे.
सौ. पूनम विशाल विधाते
कार्याध्यक्ष
पुणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस

यावेळी पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष तात्यासाहेब भिंताडे, भाजपा नेते मंदार बलकवडे, सुरेश वासवंड, सचिन पाषाणकर, भाजपा नेते गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, प्रकाश तात्या बालवडकर, लहू बालवडकर, राहुल कोकाटे, सचिन दळवी, रामदास विधाते, राजेश विधाते, भगवान विधाते, जितेंद्र विधाते, अक्षय विधाते, तुषार विधाते, विक्रम विधाते, ऋषिकेश विधाते, दिनेश विधाते, तसेच संपूर्ण विधाते परिवार उपस्थित होता.