December 5, 2024

Samrajya Ladha

बाणेर येथील ‘कल्पतरु जेड’ सोसायटीचा पाणी प्रश्न समीर चांदेरे यांच्या प्रयत्नातून मार्गी..

बाणेर :

बाणेर, पॅन कार्ड रोड येथील ‘कल्पतरु जेड’ या सोसायटीला कालच भेट देत राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांनी भेट देत तेथील समस्या जाणून घेतल्या होत्या. यामध्ये पाण्याची गंभीर समस्या समोर आली.तात्काळ आजच महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष आदरणीय बाबुराव चांदेरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या समस्येवर तोडगा काढण्यात यश आले आहे.

आम्ही विविध सोसायकांना भेट देत त्यांच्या नागरी समस्या जाणून घेऊन त्या दूर कशा करता येईल यासाठी प्रयत्न करत असतो. काल कल्पतरु जेड सोसायटीतील सन्माननीय सभासदांची भेट घेत समस्या जाणून त्यात सर्वाधिक महत्त्वाचा पाणी प्रश्न आज मार्गी लावत प्रत्यक्ष ठिकाणी उपस्थित राहून गुणवत्ता सुनिश्चित करुन काम पूर्ण केलं.
समीर चांदेरे
युवक अध्यक्ष
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस

नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील सुसंवादातून अनेक प्रश्न सोडवता येतात. चांदेरे कुटुंबाचा प्रभागातील नागरिकांशी असलेला जिव्हाळा आणि विश्वास यामुळे विकासकामे करताना कोणतीही अडचण येत नाही. प्रभागातील नागरिकांच्या हितासाठी चांदेरे कुटुंबीय सातत्याने प्रयत्नशील आहे आणि प्रभागातील नागरिकांशी असलेल्या दृढ संबंधांमधून असे अनेक विकासकामे मार्गी लागतील हा विश्वास समीर चांदेरे यांनी व्यक्त केला.

You may have missed