May 21, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

अमोल बालवडकर यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट, चंद्रकांत दादा पाटील यांना बहुमताने निवडून येण्यासाठी अथक परिश्रम घेणार..

बालेवाडी :

आज महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस यांची मुंबई येथे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी भेट घेतली.

 

याबद्दल माहिती देताना अमोल बालवडकर यांनी सांगितले की, आदरणीय देवेंद्र जी यांची प्रत्येक भेट ही प्रेरणा देणारी असते, आजची भेट ही तशीच प्रेरणादायी!

बालवडकर यांनी सांगितले की, १० वर्ष पक्षाचे तन मन धनाने अथक काम केल्यानंतर मी विधानसभा निवडणुकीसाठी कोथरुड मतदारसंघातून इच्छुक होतो. त्यानंतर देवेंद्र जी फडणवीस यांच्या माध्यमातून माझ्या इच्छेचा सन्मान करून निवडणुकीत आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले त्यांनी, नेत्याचा आदेश “सर आँखो पर”…

याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र जी यांनी आज भेट दिली, संघटन हीच शक्ती आहे आणि भारतीय जनता पक्षात कार्यकर्त्यांच्या कार्याचा योग्य वेळी योग्य तो सन्मान केला जाईल असे यावेळी देवेंद्र जी म्हणाले..

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोथरुड विधानसभा मतदारसंघ येथून चंद्रकांत दादा पाटील यांना बहुमताने निवडून येण्यासाठी अथक परिश्रम करण्याचा शब्द ही देवेंद्र जी यांना दिला असल्याची माहिती अमोल बालवडकर यांनी दिली.

यावेळी समित कदम, हेरम शेळके, विक्रम विनोदे, सागर बालवडकर, नरेंद्र बालवडकर, विक्रम साखरे, आदी मान्यवर उपस्थित होते.