January 29, 2025

Samrajya Ladha

बाणेर येथील ‘कल्पतरू जाडे’ सोसायटीशी समीर चांदेरे यांनी साधला संवाद, नागरी समस्या सोडविणार….

बाणेर :

बाणेर पॅन कार्ड रोड वरील ‘कल्पतरू जाडे’ या सोसायटी मधील नागरिकांशी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांनी दिवाळीचे निमित्त साधून नागरिकांशी संवाद साधत नागरीकांच्या अडचणी समजुन घेतल्या. तसेच दिवाळी पाडव्याच्या सर्वांना शूभेच्छा दिल्या.

 

सोसायटीत राहणाऱ्या नागरीकांना विविध प्रकारच्या नागरी समस्या उद्भवत असतात. या समस्या सोडविणे महत्वाचे असते. रोजच्या धावपळीच्या जीवनात हा सोसायटी वर्ग सामाजिक जीवनात अलिप्त असतो. आपण राबवत असलेल्या विविध प्रकारच्या उपक्रमातून सोसायटी मधील नागरिकांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण होते. त्यामूळे त्यांना आपल्याकडून त्यांच्या छोट्या मोठया समस्या सोडविल्या जाव्यात हि अपेक्षा असते. यावेळी उपस्थितांनी सांगीतलेल्या विविध नागरी अडचणी जाणून घेतल्या व लवकरच पुणे मनपाचे माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुरावजी चांदेरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली येथील नागरी अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचा विश्वास दिला.
समीर चांदेरे
युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर

 

You may have missed