बालेवाडी :
दिवाळी म्हटले की सण उत्साहाचा आनंदाचा जल्लोषाचा हा उत्साह द्विगुणीत करण्याचे काम डॅा. सागर बालवडकर यांनी आज “लोकमत स्वर चैतन्य दिवाळी पहाट” या कार्यक्रमाचे आयोजन करून केले. बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे परिसरातील नागरिकांना या कार्यक्रमात राहूल देशपांडे आणि राकेश चौरसिया यांच्यातील अनोखी जुगलबंदी पहावयास मिळाली आणि त्यांच्या जुगलबंदी ला रसिक प्रेक्षकांची तेवढीच जोरदार दाद मिळाली.
दरवर्षी दिवाळीनिमित्त परिसरातील नागरिकांची दिवाळी पहाट संगीतमय करत दिवाळीची अनोखी मेजवानी डॉ. सागर बालवडकर यांच्या मुळे बालेवाडी बाणेर परीसरात नागरीकांना मिळाली.
यावेळी कमिशनर सूरज मांढरे, सौरव अडवाणी, संजय आवटे, नितीन न्याती, निनाद देसाई, अलोक श्रीवास्तव हरीश श्रॉफ आदी मान्यवरांसह परिसरातील रसिक प्रेक्षक मोठया संख्येने उपस्थित होते.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!