October 28, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सचिन दळवी सोशल फाउंडेशनच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळी फराळ व महिला कर्मचाऱ्यांना साडी भेट..

बाणेर :

दिवाळीचे निमित्त साधून सचिन दळवी सोशल फाउंडेशनच्या वतीने परिसरातील महानगरपालिकेच्या वतीने साफसफाई करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना करिता दिवाळी फराळ व महिला कर्मचाऱ्यांना साडी वाटप सचिन दळवी जनसंपर्क कार्यालय सोमेश्वरवाडी येथे करण्यात आले.

परिसरातील सर्व भाग स्वच्छ व्हावा म्हणून सदैव कार्यरत असणारे सफाई कामगार त्यांचे काम फार मोलाचे आहेत. त्यांच्या कामाचे कौतुक म्हणून अशा साफ सफाई कामगारांची दिवाळी गोड करण्याच्या हेतूने त्यांच्याकरिता मिठाईचे वाटप व सफाई करणाऱ्या महिला भगिनींना भाऊबीज म्हणून साडी भेट करत आहे.
सचिन दळवी
सरचिटणीस
भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडल

यावेळी संजय निम्हण,संतोष सपकाळ, दिलीप सुतार, गोकुळ जाधव, सचिन सुतार, आदित्य दळवी व मित्र परिवार उपस्थित होते.

 

You may have missed