बाणेर :
दिवाळीच्या निमित्त साधत दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून माजी नगरसेविका ज्योती कळमकर आणि भाजपा नेते गणेश कळमकर यांच्या वतीने बाणेर नामांकित कलाकारांच्या सोबतीने राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री राजेश पांडे यांच्या साक्षीने परिसरातील रसिक श्रोत्यांची दिवाळी पहाट सुरेल गीतांनी बहारदार ठरली.
प्रभागातील नागरिकांसाठी यावर्षी देखील श्रीनाथ सोशल फाउंडेशन आयोजित सप्तसुरांचा अनोखा साक्षात्कार असलेला राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध पार्श्वगायिका बेला शेंडे तसेच “ETV गौरव महाराष्ट्राचा – सुर गृह लक्ष्मीचा” फेम ज्योती गोराणे (पार्श्वगायिका),”सुर नावा ध्यास नवा” फेम रवींद्र खोमणे (पार्श्वगायक) व कलर्स मराठी “सुर नवा ध्यास नवा” झी सारेगमप फेम प्रियांका ढेरंगे चौधरी (पार्श्वगायिका) यांच्या सुमधुर संगीत गायन कार्यक्रमाने बाणेर – बालेवाडी – पाषाण – सुतारवाडी मधील श्रोते मंत्रमुग्ध झाले.
या संगीतमय बहारदार कार्यक्रमांमध्ये गवळणी पासून लावण्यापर्यंत आणि चित्रपटातील बहारदार गाण्यांपासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्फूर्ती गीतांपर्यंत अतिशय सुमधुर लोकप्रिय गाण्यांची मैफिल सजली होती. रसिक प्रेक्षकांनी देखील टाळ्या शिट्ट्या वाजवत गाण्याच्या तालावर ठेका धरलेला पहायला मिळाला.
यावेळी माजी नगरसेवक ज्ञानेश्र्वर तापकीर, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर, प्रकाश बालवडकर, प्रल्हाद सायकर, डॉ. राजेश देशपांडे, प्रवीण शिंदे, सुभाष भोळ, कल्याणी टोकेकर, वैशाली कमाजदार, जागृती विचारे, आशिष ताम्हाणे,संदीप कळमकर लखन कळमकर, प्रशांत कळमकर, हेमंत कळमकर, अभिषेक कळमकर आणि परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरव निवृत्ती कळमकर यांनी केले होते तर संयोजन विश्र्वास कळमकर यांनी केलेले.
More Stories
बालेवाडी येथील सी एम इंटरनॅशनल स्कूल चा शैक्षणिक वर्ष २०२४ – २५ चा इयत्ता दहावी चा निकाल १००%
बाणेर-बालेवाडी, सुस, म्हाळुंगे परिसरातील पावसाळी व ड्रेनेज लाईनच्या साफसफाईची सौ. पूनम विधाते यांची पालिका प्रशासनाकडे मागणी..
पाषाण कोथरूड मधील सह्याद्री इंटरनॅशनल स्कूलची २५ वर्षांची यशस्वी वाटचाल; दहावी आणि बारावीचा १००% निकाल!