July 10, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर टेकडी सुरक्षेबाबत महेश बोळकोटगी (वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाणेर पोलीस ठाणे) यांनी घेतली मीटिंग…

बाणेर :

पुणे शहर पोलीस बाणेर पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या बाणेर टेकडी येथे घडलेले गुन्हे च्या अनुषंगाने नागरिकांनी काय काळजी घेतली पाहिजे, पोलिसांची भूमिका व कर्तव्ये, बाणेर-बालेवाडी-पाषाण-सुतारवाडी भागातील नागरिकांची सुरक्षितता याबाबत मुरकुटे गार्डन व सोलर गार्डन या ठिकाणी दि 26.10.24 रोजी सकाळी 06.30 ते 08.00 दरम्यान महेश बोळकोटगी (वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाणेर पोलीस ठाणे) यांनी समक्ष भेट देऊन माननीय पोलीस आयुक्त सो पुणे शहर यांनी दिलेल्या खालीलप्रमाणे सूचना नागरिकांना दिल्या.

 

1. तात्काळ मदतीकरिता 24*7 कार्यरत असणारे helpline क्र 112 नंबर 100 नंबर
2. ⁠पुणे शहर पोलीस व्हाट्सअप ग्रुप क्रमांक
3. ⁠जेष्ठ नागरिक यांच्याकरिता बाणेर पो ठाणे क्रमांक व त्यांच्याकरिता राबविण्यात येत असलेली उपाययोजना
4. ⁠एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक यांची माहिती संकलन व मदत करणे
5. ⁠सायबर गुन्हे फसवणूक बाबत माहिती
6. ⁠बाणेर पोलीस ठाणेचा क्रमांक लोकेशन
7. ⁠ बाणेर टेकडीवर जाणारे नागरिक यांचे करिता एकूण दहा ते बारा मार्गांवर सूचना फलक त्याचेवर अत्यावश्यक सेवा,बाणेर पोलीस ठाणे,पुणे शहर पोलीस आयुक्तालय यांचे क्रमांक व व्हाट्सअप ग्रुप क्रमांक
8. ⁠बाणेर परिसरामध्ये चालू करण्यात येणारे पोलीस मदत केंद्र
9. ⁠मा पोलीस आयुक्त पुणे शहर सरांनी पुणे शहरातील सर्व टेकड्या या CCTV निगराणीखाली करण्याबाबत लावण्यात येणारे कॅमेरे बाबत माहिती
10. ⁠टेकड्यांवर लावण्यात येणारे PA सिस्टीम
11. ⁠AKSA LIGHTS
12. ⁠पोलीस गस्त , पोलीस SCANNER

याबाबत माहिती देण्यात आलेली आहे नमूद कार्यक्रमास एकूण 200 ते 300 नागरिक उपस्थित होते. नमूद मीटिंग शांततेत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली व नागरिकांनी सकारात्मक रित्या प्रतिसाद देऊन सायंकाळी 06.00 ते पहाटे 05.00 पर्यंत बाणेर टेकडीवर कोणीही जाऊ नये याबाबत सर्व नागरिकांमध्ये संदेश देऊन नागरिकांना स्वतःहून सूचना देणार असलेबाबत माहिती दिलेली आहे .

या मीटिंग मध्ये बाणेर हिल सेफ्टी ग्रुपचे सदस्य सौ कल्याणी टोकेकर, सौ निकिता माताडे आणि मिस जागृती विचारे उपस्थित होते.

तसेच PEOPLE AWARNESS बाबतचा पोलिसांचा जनतेशी संवादपर असलेला हा कार्यक्रम पुन्हा पुन्हा घेण्यात यावा याबाबत सूचना केलेली आहे.