बावधन :
चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, बावधन येथे 26 ऑक्टोबर 2024, शनिवार रोजी स्वरगंध प्रस्तुत “दिवाळी पहाट” या सुमधुर संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पेरिविंकलचा ठसा हा केवळ शिक्षणासाठीच नाही तर सांस्कृतिक वारसा जपण्यात सुद्धा पेरिविंकल स्कूल ही अग्रगण्य आहे हे यावरून सिद्ध होते.
कार्यक्रमाचा प्रारंभ हा पारंपरिक सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आला. प्रसिद्ध गायिका अनघा नवरे, गायक आनंद नवरे व अभय मराठे प्रस्तुत स्वरगंध कार्यक्रमाची सुमधुर व सुगम गाण्यांची बहारदार मैफिल पेरीविंकल च्या प्रांगणात सर्व पालकगण, विदयार्थी व शिक्षकवर्ग व ग्रामस्थ यांच्या समवेत रंगली होती. याप्रसंगी गायक मान्यवर, चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष व संस्थापक माननीय श्री. राजेंद्र बांदल सर संचालिका सौ.रेखा बांदल, कू.शिवानी बांदल व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सर्व गायक मान्यवरांचा सत्कार शाळेचे संस्थापक व संचालिका यांच्या हस्ते करण्यात आला.
सुर निरागस हो, दिवाना हुआ बादल, चिंब पावसाने रान झाले आबादानी, पापा कहते है अशा एक से एक बढकर गाण्यांनी परिविंकलची ही महादिवाळी पहाट रंगली होती. प्रेक्षकांनी या गाण्यांचा मनमुराद आनंद लुटला. या कार्यक्रमासाठी बावधन गावातील नागरिक तसेच पालकवर्ग, विद्यार्थी, शिक्षक वृंद हे मोठ्या संख्येने उपस्थित होते व या सर्वांनीच कार्यक्रमाला अतिशय उस्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच रसिक प्रेक्षकांनी कार्यक्रमास खुल्या मनाने दाद दिली.कार्यक्रमाअंतर्गत फुड स्टॉल चे देखील नियोजन करण्यात आले होते.टोकन घेऊन भेळ,पोहे, चहा अशा विविध स्टॉल लावण्यात आले होते. त्यामुळे संगीतप्रेमी आणि खवैये या दोघांचा आज मिलाप होऊन बहारदार अशी स्वरगंध ची मैफिल आज सगळ्यांनाच मंत्रमुग्ध करणारी ठरली.
या कार्यक्रमानंतर शाळेतील सर्व शिक्षकवृंदांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बोनस मिठाईचे वाटप करण्यात आले. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना फराळ वाटप करण्यात आले.
शाळेचे संस्थापक राजेंद्र बांदल सर व संचालिका रेखा बांदल यांनी दिवाळीचे महत्त्व विशद करून विद्यार्थ्यांना व शिक्षकांना दिवाळीच्या आभाळभर शुभेच्छा दिल्या. शाळेमध्ये असे कार्यक्रम वारंवार राबवण्यात येऊन अभ्यासाबरोबरच संस्कृती जपली जाणे हे आजकालच्या आधुनिक काळात तेवढेच गरजेचे असून विद्यार्थ्यांना असेच प्रोत्सह देण्याचे आवाहन यावेळी बांदल सर यांनी केले. सर्व कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने व उत्साहात संपन्न झाला.
या यशस्वी कार्यक्रमाचे नियोजन संस्थेच्या तरुण तडफदार डायरेक्टर शिवानी बांदल व सदैव हसतमुख अशा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली पर्यवेक्षिका इंदू पाटील कल्याणी शेळके व नेहा माळवदे तसेच शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मदतीने करण्यात आले होते. तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिशय उत्कृषटपणे बावधन शाखेतल्या सायली गायकवाड, प्रज्ञा केळकर, लक्ष्मी परांजपे व सुस शाखेच्या प्रफुल्ला पाटील आणि सचिन खोडके सर यांनी केले.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी