बाणेर :
‘वामा वुमन्स क्लब’ च्या अध्यक्षा सौ. पुनम विशाल विधाते यांच्या वाढदिवसानिमित्त वामा वुमन्स क्लब च्या वतीने सोमवार, 28 ऑक्टोबर 2024 रोजी स. 10 ते सायं. 5 या वेळेत महाआरोग्य शिबिर आणि भव्य रक्तदान शिबिर सौ. पुनम विशाल विधाते जनसंपर्क कार्यालय, विधाते वस्ती येथे आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिराचा उद्देश समाजातील नागरिकांना मोफत आरोग्य सेवा पुरवणे तसेच रक्तदानाचे महत्त्व वाढवणे हा आहे.
आरोग्य शिबिरात प्रमुख आकर्षण मोफत नाडी तपासणी होणार असून ही तपासणी प्रसिद्ध नाडी तज्ञ डॉ. तेजस्विनी भाले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे. याशिवाय, रक्तदाब, ब्लड शुगर, डोळे, दात या सामान्य तपासण्यांसह स्त्रीरोगतज्ञ व बालरोगतज्ञ यांच्या कडून वैद्यकीय सल्ला व तपासणी करण्यात येणार आहे. शिबिरात आरोग्य तपासण्यांसोबतच शासनाच्या विविध आरोग्य योजनांची माहिती सुद्धा नागरिकांना दिली जाणार आहे, ज्याचा लाभ घेऊन ते त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊ शकतात.
सर्वांसाठी हे शिबिर समाजाच्या स्वास्थ्यवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होऊन या उपक्रमाला यशस्वी करावे. सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा आणि आरोग्य सेवांचा फायदा करून घ्यावा, तसेच रक्तदानाच्या महान कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी