बालेवाडी :
लक्ष्मण नगर, बालेवाडी येथील लेन क्र. 5 च्या रस्त्याकडेची झाडे झुडपे वाढल्यामुळे रस्ता अरुंद झाला होता. त्यामुळे येथे ट्रॅफिकची समस्या निर्माण झाली होती. नागरिकांनी ही समस्या निदर्शनास आणून दिली असता आज जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशनच्या वतीने स्वखर्चातून सदर रस्त्यावरील झाडे झुडुपे JCB मशीनच्या सहाय्याने काढून घेण्यात आली व रस्ता रुंद करून घेण्यात आला.
जयेश मुरकुटे यांनी नागरीकांच्या छोट्या मोठया समस्या, आणि नागरीकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाच्या अडचणी तत्परता दाखवत त्या सोडविण्यावर भर दिला आहे. त्यामूळे नागरीक समाधान व्यक्त करत जयेश चे कौतुक करत आहेत.
More Stories
सुस, म्हाळुंगे, बावधन, हनुमान विविध सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी गणपततात्या राजाराम चांदेरे यांची बिनविरोध निवड
रोटरी क्लब ऑफ पुणे बाणेरतर्फे विद्यापीठ हायस्कूल येथे कृषी दिन आणि वैद्यक दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
बाणेरच्या सिद्धांत मांडगेची राष्ट्रीय इनडोअर आईस स्केटिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी!