November 14, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बालेवाडी येथील सीएम इंटरनॅशनल स्कूलला अतिरिक्त अभ्यासक्रम उपक्रमांना प्रोत्साहन देण्यात उत्कृष्टता” यासाठी एलड्रॉक इंडिया आयोजीत ‘के -१२ सन्मान सोहळा IKA – २०२४’ मध्ये केले सन्मानित…

बालेवाडी :

जेडब्ल्यू मॅरिट येथे संपन्न झालेल्या एलड्रॉक इंडिया आयोजीत ‘के -१२ सन्मान सोहळा IKA – २०२४’ मध्ये सीएम इंटरनॅशनल स्कूल बालेवाडी यांना “संपूर्ण विकासासाठी अतिरिक्त अभ्यासक्रम उपक्रमांना प्रोत्साहन देण्यात उत्कृष्टता” यासाठी सन्मानित करण्यात आले.

एस के पी संस्थेचे संस्थापक श्री गणपतराव बालवडकर, सचिव डॉ. सागर बालवडकर, प्रा. रूपाली सागर बालवडकर आणि सी.एम. इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या इकबाल राणा कौर यांनी शाळेचे, विद्यार्थ्यांचे, पालकांचे आणि सर्व शिक्षकांचे आभार मानले.

आपण दिलेल्या प्रोत्साहनामुळे आम्ही असेच प्रयत्नपूर्वक नवनवीन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देऊ
डॉ. सागर बालवडकर
सचिव, एसकेपी कॅम्पस, बालेवाडी